आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kapil Sharma To Cut Down His Comedy Show For Movie Career

मोठ्या पडद्यावर संधी मिळाल्याने बिघडले कपिलचे वेळापत्रक, आता टीव्ही शोसोबत करणार तडजोड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रसिद्ध विनोदवीर कपिल शर्माच्या करिअरसाठी 2013 हे वर्ष खूप चांगलं ठरलं. गेल्या वर्षी कपिलने कलर्स वाहिनीवर कॉमेडी नाइट्स विथ कपिल हा शो आणला. या शोने लोकप्रियतेचे सर्व उच्चांक गाठले. कपिलचे अभिनय कौशल्य बघून यशराज बॅनरने त्याला आपल्या आगामी तीन सिनेमांसाठी साइन केले.
अलीकडेच यशराज बॅनरने याची अधिकृत घोषणासुद्धा केली. या तीन सिनेमांपैकी कपिलच्या पहिल्या सिनेमाचे नाव 'बँक चोर' आहे. हा सिनेमा बंपी दिग्दर्शित करणार आहेत. नुकताच या सिनेमातील कपिलचा लूकही समोर आला. आता एवढी मोठी ऑफर मिळाल्यानंतर कपिल शर्माला वेळेचा तुटवडा भासू लागला आहे.
आत्तापर्यंत कपिलचे संपूर्ण लक्ष त्याच्या शोवर होते. मात्र आता त्याला आपल्या सिनेमासाठीसुद्धा वेळ द्यावा लागणार आहे.
कपिलला खरी प्रसिद्धी 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या शोने मिळवून दिली. त्यामुळे तो हा शोसुद्धा सोडू शकत नाहीये. या शोचे शुटिंग सांभाळत सिनेमाचे शुटिंग करणे हे त्याच्यासाठी तारेवरची कसरत ठरणार आहे. त्यामुळे आपले फिल्मी करिअर वाचवण्यासाठी कपिलने एक निर्णय घेतला आहे. कपिलने आपल्या टीव्ही शोसोबत तडजोड करण्याचे ठरवले आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या कपिलने कोणता निर्णय घेतला आहे आणि आपल्या शोविषयी तो कोणती तडजोड करणार आहे...