आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजय देवगनच्या ऑनस्क्रीन मुलीसोबत रोमान्स करणारेय कपिल शर्मा, ही असेल फिल्म

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः 'किस किसको प्यार करुं' या सिनेमानंतर कॉमेडियन कपिल शर्मा पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. आपल्या दुस-या सिनेमात कपिल अभिनेता अजय देवगणची ऑनस्क्रिन मुलगी इशिता दत्तासोबत रोमान्स करताना दिसणारेय. या सिनेमाचे नाव असेल 'फिरंग'. हा एक पीरिअड कॉमेडी सिनेमा असेल. कपिलचे खास मित्र राजीव ढिंगरा या सिनेमाचे दिग्दर्शक असून त्यांनी यापूर्वी 'लव पंजाब' हा सिनेमा दिग्दर्शित केला होता.
'दृश्यम'मध्ये अजयच्या मुलीच्या भूमिकेत होती इशिता...
इशिताला आपण यापूर्वी 2012 मध्ये रिलीज झालेल्या दृश्यम या सिनेमात अजय देवगणची मुलगी अनू सलगावकरची भूमिका वठवताना पाहिले होते. मुळची जमशेदपूर (झारखंड)ची असलेल्या इशिताने यापूर्वी दाक्षिणात्य सिनेमांमध्ये काम केले आहे. एका टीव्ही चॅनलवरील 'रिश्तों का सौदागर- बाजीगर' यामध्ये इशिता मुख्य भमिकेत झळकली होती. सोबतच टीव्ही सीरियल 'एक घर बनाऊंगा' मध्येही इशिता मुख्य भूमिकेत झळकली होती.
इशिताला ट्रॅव्हलिंग आणि कुकिंगची आवड
- इशिताला ट्रॅव्हलिंग आणि कुकिंगची भारी आवड आहे. कुकिंगमध्ये बेकिंग डिश तिच्या फेव्हरेट आहेत.
- इशिताला फिरायला जायला आवडत असले तरी सुट्यांमध्ये तिला फॅमिलीसोबत राहायला आवडते. यावेळी ती हौसेने त्यांच्यासाठी काही नवीन डिश तयार करते.
- याशिवाय इशिताला वाचनाची विशेष आवड आहे.


तनुश्री दत्ताची बहीण आहे इशिता
- इशिता ही बॉलिवूड अॅक्ट्रेस तनुश्री दत्ताची लहान बहीण आहे.
- बहिन बॉलिवूड स्टार असली तरी इशिताने सर्व रोल स्वतःच्या मेहनीतवर मिळविले असून तिला तिच्या मेहनीतवर करिअर करण्याची इच्छा आहे.
- इशिताचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण जमशेदपूर येथील डीबीएम स्कूलमध्ये झाले.
- इशिताचे येथे 12 वी पर्यंत शिक्षण झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ती मुंबईला गेली.
अनुपम खेर यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये घेतले अॅक्टिंगचे ट्रेनिंग
- 12 वी पर्यंत जमशेदपूर येथे शिक्षण झाल्यानंतर इशिता मुंबईत बहिणीकडे आली.
- येथे तिने सोपाया कॉलेजमधून मास कम्यूनिकेशनमध्ये ग्रॅज्यूएशन केले.
- त्यानंतर अॅक्टिंगकडे मोर्चा वळवला, त्यासाठी अनुपम खेर यांच्या अॅक्टिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला.
दोघी बहिणी एकमेकींच्या बेस्ट फ्रेंड
- इशिताचे वडील तपन कुमार यांनी सांगितले, की दोघी बहिणी एकमेकींच्या बेस्ट फ्रेंड आहेत.
- तनुश्री मोठी असल्यामुळे ती इशिताला प्रत्येक वळणावर काय केले पाहिजे हे व्यवस्थित समजावून सांगते.
- चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी आवश्यक असलेल्या सर्व महत्त्वाच्या बाबी तनुश्रीने तिला समजावून सांगितल्या होत्या.
- तपन कुमार यांना दोन्ही मुलींचा विशेष अभिमान वाटतो. ते म्हणतात, त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली, याचा मला फार अभिमान वाटतो.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, इशिता दत्ताचे निवडक फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...