आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'Day: पैसा-प्रसिद्धी मिळाल्यानंतरही सामान्य घरात वास्तव्याला आहे हा विनोदाचा बादशाह

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(विनोदवीर कपिल शर्माचे घर)
मुंबई - विनोदवीर कपिल शर्मा आज आपला 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. विनोदाचा बादशाह असलेला कपिल आज यशोशिखरावर आहे. मात्र भरपूर पैसा, प्रसिद्धी मिळाल्यानंतरसुद्धा कपिल अगदी सामान्य घरात वास्तव्याला आहे. जेव्हा कपिलला कुणी ओळखत नव्हते, तेव्हापासून कपिल या घरात राहतोय.
कपिल शर्माच्या बिल्डिंग आणि प्रवेशद्वाराची छायाचित्रे बघितली असता, त्याचे घर किती साधे आहे याचा अंदाज तुम्हाला येईल. स्टारडम मिळाल्यानंतरसुद्धा कपिल आपल्या या घरातून दुस-या मोठ्या आलीशान घरात जाऊ इच्छित नाही. हे घर आपल्यासाठी लकी सिद्ध झाल्याचे कपिल समजतो. कदाचित त्यामुळेच तो हे घर बदलू इच्छित नाही.
खरं तर सेलिब्रिटींकडे पैसे आल्यानंतर ते स्वतःसाठी आलीशान आशीयानाच्या शोधात असतात. कपिल मात्र त्याला अपवाद आहे. कपिल आज मुंबईतील एखाद्या पॉश परिसरात महागडे घर खरेदी करु शकतो, मात्र तो आपले हे लकी घर सोडू इच्छित नाही.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा कपिलच्या घराची निवडक छायाचित्रे...