आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सव्वा कोटी घेऊनसुद्धा कपिलने दिला दगा, ओढवून घेतला सलमानचा रोष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' हा शो लोकप्रिय झाल्यापासून विनोदवीर कपिल शर्माचे पाय जमीनीवर नाहीत. म्हणून तर त्याला बॉलिवूडचा दबंग सलमान खानच्या रागाची पर्वा नाहीये. नकळत का होईना कपिलने सलमानसह पंगा घेतला आहे.
झालं असं, की सेलिब्रिटी क्रिकेट लीच्या उद्घाटनाच्या वेळी कपिल शर्माला सुत्रसंचालनाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र सुत्रसंचालन करण्याऐवजी कपिल येथे टॅन्ट्रम्स दाखवू लागला. खरं तर या कार्यक्रमासाठी कपिलने तब्बल सव्वा कोटी रुपये मानधन घेतले होते.
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, कपिलला व्हॅनिटी व्हॅन आणि इतर काही सुविधा न मिळू शकल्याने तो सीसीएलची मॅच अर्ध्यावरच सोडून निघून गेला. कपिलच्या अशा वागण्यामुळे मुंबई हीरोज टीमचा मालक सोहेल खान त्याच्यावर चांगला नाराज झाला आहे.
कपिलला आता केवळ सोहेलच्याच नव्हे तर सलमानच्या रागाला सामोरे जावे लागणार आहे. कारण सलमान सीसीएलमध्ये नेहमी अँक्टिव असतो.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या सविस्तर वृत्त...