आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shocking! Karan Mehra To Quit 'Yeh Rishta Kya Kehlata Hai'

Shocking! 'यह रिश्ता क्या कहलाता है'ला 'नैतिक' करणार अलविदा, 7 वर्षांचा प्रवास थांबवणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या 'यह रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेच्या चाहत्यांसाठी आहे एक खास बातमी. मालिकेत नैतिक सिंघानिया ही व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता करण मेहरा काही आठवड्यानंतर या मालिकेत दिसणार नाहीये. एका सूत्राने दिेलेल्या माहितीनुसार, करण मेहराने आता ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 'यह रिश्ता क्या कहलाता है'ची टीम फेब्रुवारी महिन्यात हाँगकाँग येथे शूटिंगसाठी रवाना होणारेय. येथे मालिकेतील एका खास भागाचे शूटिंग होणारेय. दहा दिवस येथे ही टीम शूटिंग करणारेय. येथून परतल्यानंतर करण मालिकेला अलविदा करणारेय.
करण गेल्या सात वर्षांपासून या मालिकेत काम करत आहे. या मालिकेतूनच तो प्रसिद्धीझोतात आला. तो ही मालिका का सोडतोय, यामागचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र या मालिकेत त्याला त्याच्या वयापेक्षा मोठी व्यक्तिरेखा साकारावी लागत असल्याने तो नाराज असल्याची चर्चा इंडस्ट्रीत आहे. त्यामुळेच कदाचित त्याने हा निर्णय घेतला असावा. याविषयी अद्याप करणचे स्पष्टीकरण आलेले नाही. करणसह हिना खान, रोहन मेहरा, उमंग जैन आणि अशनूर कौर हे कलाकार या मालिकेत दिसत आहेत.
नुकतेच या मालिकेने यशस्वी सात वर्षे पूर्ण केली आहेत. पुढील स्लाईड्समध्ये पाहा, करणने मालिकेच्या कलाकारासोबत कसे केले होते सेलिब्रेशन...