आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा करतोय हा अॅक्टर, एकेकाळी काम्या पंजाबीसोबत जुळले होते सूत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'ये हैं मोहब्बतें' या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता करण पटेल आणि त्याची पत्नी अंकिता भार्गव आज (3 मे) त्यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा करत आहे. हा खास दिवस ते भारतात नव्हे तर परदेशात साजरा करत आहे. यंदाचा लग्नाचा वाढदिवस हे दोघे ग्रीसमध्ये साजरा करत आहेत.  

करण-अंकिताचे अरेंज्ड मॅरेज 
अंकिता ही अभिनेते अभय भार्गव यांची मुलगी आहे. ये हैं मोहब्बतें या मालिकेत अभय भार्गव यांनी करणच्या सास-यांची आणि दिव्यांका त्रिपाठींच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. म्हणजेच रिल आणि रिअल लाइफमध्ये अभय भार्गव करण पटेलचे सासरे झाले आहेत. divyamarathi.comला दिलेल्या एका मुलाखतीत अभय भार्गव यांनी सांगितले होते, की करण पटेल चांगली व्यक्ती आहे. मला करणसारखाच जावई हवा होता. माझे हे स्वप्न पूर्ण झाले आहे. छोट्या पडद्यावर मी त्याच्या सास-याचे पात्र साकारत आहे. मला विश्वास बसत नाहीये, की हे ख-या आयुष्यातसुध्दा हे नाते रुपांतरीत झाले आहे. 

कशी झाली होती अंकिता-करणची भेट 
4 मार्च 2015 रोजी अभय भार्गव यांनी एका पार्टीचे आयोजन केले होते. त्यामध्ये करणसुध्दा आला होता, पार्टीतच करण आणि अंकिताची दोघांची ओळख झाली. केवळ दोन दिवसानंतर त्यांनी आपआपल्या पालकांसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. हे ऐकून मी खूप आनंदी झालो आणि त्यांना होकार दिला. हे लव्ह मॅरेज नसून कुटुंबीयांच्या सहमतीने होणारे अरेंज मॅरेज आहे. 

टीव्ही अॅक्ट्रेस काम्या पंजाबीसोबत करण होता रिलेशनशिपमध्ये.. 
अंकिता करणच्या आयुष्यात येण्यापूर्वी तो टीव्ही अभिनेत्री काम्या पंजाबीसोबत रिलेशनशिपमध्ये होते. काम्यापासून विभक्त झाल्यानंतर त्याने अंकितासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. याविषयी अभय यांना विचारले असता ते म्हणाले होते, की प्रत्येकाचा एक भूतकाळ असतो. कुणाचा भूतकाळ उखडून काढणे चुकीचे आहे. करणचा एक भूतकाळ होता आणि आता अंकिता त्याचे भविष्य आहे. मला करणच्या भूतकाळाशी काहीच अडचण नाहीये. 

करण आणि अंकिताच्या लग्नाच्या दुस-या वाढदिवसाच्या औचित्याने बघुयात त्यांच्या लग्नाचा खास अल्बम... 
बातम्या आणखी आहेत...