आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्ही मालिकेवरुन निर्माण झाला वाद, 19 वर्षांच्या अॅक्ट्रेससोबत रोमान्स करतोय 10 वर्षांचा मुलगा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
मुंबईः सोनी वाहिनीवर नव्याने दाखल झालेली ‘पहरेदार पिया की’ ही मालिका वादात अडकली आहे. मालिकेच्या कथानकावरुन वादाची ठिणगी पडली आहे. या मालिकेवर टेलिव्हिजन विश्वातील कलाकारांनीच खंत व्यक्त केली आहे. या मालिकेच्या प्रोमोपासूनच नेमकं कथानक कसं असणार हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत होता. या मालिकेच्या प्रोमोमध्ये एक लहान मुलगा त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या मुलीच्या भांगात कुंकू भरताना दिसला होता. मुख्य म्हणजे टेलिव्हिजन अभिनेता करण वाही यालासुद्धा मालिकेचे कथानक खटकले आहे. त्यामुळेच त्याने फेसबुकवर या कार्यक्रमाविषयी आपलं मत स्पष्टपणे मांडलं आहे.

काय म्हणाला करण वाही... 
- करणने त्याच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले, - "प्रिय निर्माता आणि चॅनल... मी समजू शकतो की आपण हाऊ आय मेट युवर मदर आणि फ्रेंड्स यांसारखे शोज बनवू शकत नाहीत."
- "प्रामाणिकपणे सांगायचे, म्हणजे मी याची अपेक्षासुद्धा ठेवत नाही. पण आपण सर्वजण या इंडस्ट्रीत असताना कमीतकमी टीआरपीच्या कंटेंटच्या नावावर लोकांना अडाणी बनवू नका."
- "मी हे सर्व यासाठी म्हणतोय, कारण आपण यापेक्षा अजून चांगले शोज बनवू शकतो."
 
सुयशने दिले करणच्या पोस्टला उत्तर... 
- करणने या कार्यक्रमाविषयी खंत व्यक्त केल्यानंतर या मालिकेतील अभिनेता सुयश रायने मालिकेविषयी काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. - सुयशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या मालिकेतीलच काही दृश्यांचे फोटो काढत त्यासोबत भलंमोठं कॅप्शनही लिहिलं आहे. 
- करण वाहीला उद्देशून त्याने लिहिलंय, ‘करण वाहीने जे म्हटलंय त्याला कोणीही विरोध करु शकत नाही. ते सर्वस्वी त्याचं मत आहे. पण, आम्ही सर्वच कलाकारांनी या कार्यक्रमासाठी फार मेहनत घेतली आहे. आम्ही फक्त प्रेक्षकांचं मनोरंजन करु इच्छितो. बालविवाह किंवा इतर कोणत्याच रुढीला प्रोत्साहन देण्याचा आमचा मनसुबा नाही’, असं त्याने स्पष्ट केलंय.  

पुढे वाचा, करण-सुयशचे पोस्ट आणि वाचा, काय आहे पहरेदार पिया की शोचा कंटेंट.... 
 
बातम्या आणखी आहेत...