आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमाचे रंग उधळल्यानंतर भर रस्त्यात भांडताना दिसले हे दोघे, रडत कारबाहेर पडली करिश्मा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करिश्मा तन्ना-उपेन पटेल, इनसेटमध्ये कारबाहेर उभा उपेन पटेल - Divya Marathi
करिश्मा तन्ना-उपेन पटेल, इनसेटमध्ये कारबाहेर उभा उपेन पटेल
मुंबईः याचवर्षी मे महिन्यात करिश्मा तन्ना आणि उपेन पटेल यांच्या ब्रेकअपची बातमी आली होती. बिग बॉसच्या आठव्या पर्वात दोघांचे सूत जुळले होते. पण मे महिन्यात दोघांनी ब्रेकअप झाल्याचे जाहिर केले. त्यानंतर गुरुवारी (22 सप्टेंबर) मुंबईतील रस्त्यांवर या दोघांना भांडताना पाहिले गेले. इंडिया फोरमच्या रिपोर्टनुसार, रात्री 11च्या सुमारास करिश्मा उपेनला कारमध्ये बसण्याची विनंती करत होती. मात्र उपेनने नकार दिल्यानंतर करिश्मा आपल्या मैत्रीणीला म्हणाली, "तो खूप हट्टी आहे. गाडीत बसण्यासाठी तयार नाही होणार."
आणि रडत कारबाहेर पडली करिश्मा...
इंडिया फोरम डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, करिश्मा तन्ना आणि उपेन पटेल हे रस्त्यावर भांडताना दिसले. यावेळी करिश्मासोबत तिची एक मैत्रीण होती. तिने उपेनला गाडीत जाऊन बसण्यास सांगितले. पण उपेनने गाडीत जाऊन बसण्यास नकार दिला. त्यावर करिश्माने आपल्या मैत्रीणीकडे तक्रार करत म्हटले की, तो खूप हट्टी आहे. गाडीत बसण्यासाठी तयार नाही होणार. त्यानंतर पूर्वाश्रमीचे प्रियकर असलेले हे प्रेमीयुगुल गाडीत बसून एकमेकांशी वाद घालू लागले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही मिनिटांनंतर करिश्मा गाडीतून बाहेर आली आणि रडू लागली. त्यानंतर उपेनही गाडीतून बाहेर येऊन फूटपाथवर बसला. या सर्व प्रकारानंतर उपेनचा ड्रायव्हर गाडी घेऊन आला आणि दोघेही गाडीत बसून गेले. पण, तरीही या दोघांमधील वाद मिटले नाहीत. काही वेळानंतर उपेन गाडीतून बाहेर पडला आणि टॅक्सीत बसून निघून गेला. हा सर्व प्रकार ‘बँजो’ सिनेमाच्या स्क्रिनिंगनंतर घडला.
'बिग बॉस 8'मध्ये दिली होती प्रेमाची कबुली
'बिग बॉस'च्या आठव्या पर्वात हे दोघे सहभागी झाले होते. येथेच दोघांमध्ये सूत जुळले. मध्यंतरी ‘लव स्कूल’, ‘नच बलिए’ या कार्यक्रमांतून उपेन आणि करिश्माच्या प्रेमाने त्यांच्या चाहत्यांच्या मनावरही छाप पाडली होती. प्रसिद्ध वाहिनीच्या एका क्रार्यक्रमादरम्यान उपेनने करिश्माला प्रपोज केल्यामुळे त्यांच्या नात्याबद्दल अनेकांना आणखीनच उत्सुकता लागून राहिलेली. पण उपेन पटेलने त्याच्या ट्विटर अकाउंटवरुन करिश्मासोबतच्या नात्यात आलेल्या दुराव्याबद्दलच्या बातमीला दुजोरा दिल्याने संपूर्ण चित्र स्पष्ट झाले. पण, दूर झाल्यानंतरही या दोघांमध्ये वाद होताना दिसत आहेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, एकेकाळी प्रेमात असताना दोघांनी एकत्र घालवलेले रोमँटिक क्षण...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...