आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bigg Boss Analysis: गौतम हीरो तर करिश्मा बनली खलनायक, वाढणार कटुता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(करिश्मा तन्ना)
यावेळी वीकेंडचा वॉर मनोरंजक होता. सलमान खानने शोमध्ये मस्तीभ-या अंदाजात घरात प्रसन्न वातावरण निर्माण केले. तसेच, घरातील सदस्यांचा क्लासदेखील घेतला. सुकिर्ती शोमधून आऊट झाली आहे. जाता-जाता प्रणितला गुलामीमधून वाचवून घरात प्रीतमच्या रुपात नवीन गुलाम दिला आहे. सुकिर्ती आणि गौतम यांच्या नात्यात अखेर गोडवा आलाच नाही. शोमध्ये पुनीतचा बिनधास्त आणि धिनचॅक डान्स सर्वात गंतीशीर आणि मनोरंजनात्मक होता...आजच्या एपिसोडसाठी आमच्याकडून 4 स्टार...
सलमानची मस्ती
शनिवारी तुम्ही पाहिले, की सलमानने करिश्मा आणि गौतमचा क्लास घेतला. रविवारीसुध्दा सलमान सदस्यांसोबत हलक्या अंदाजात वागत होता. सलमानने नताशाला ओरडायला सांगितले आणि गौतमला शांत बसायचे सांगून म्हणाला, 'हीरो बनण्याची गरज नाहीये.' एवढेच नव्हे, नताशाच्या तुटक्या-फुटक्या हिंदीत गाणेदेखील ऐकले.
एँडी आणि काम्याने खडसावले
शोमध्ये प्रत्येक आठवड्याला काहीतरी नवीन टि्वस्ट पाहायला मिळतो. स्पेशल पॅनल म्हणून काम्या आणि अँडीला शोमध्ये आणण्यात आले आहे. दोघांनी स्पष्ट केले, की स्पर्धक दोन आठवडे घालवल्यानंतरदेखील एकमेकांना ओळखत नसल्यासारखे परफॉर्म करत आहेत. काम्याने गौतमला शिवीगाळ करून खडसावले आणि करिश्माला चालूगिरी करून नकोस म्हणून सांगितले. करिश्माला काम्या म्हणाली, की तू गौतमला हिरो बनवले आहेस. अँडीसुध्दा स्पर्धकांना खेळ समजावून सांगताना दिसला. काम्या आणि अँडीच्या बोलण्याचे हे स्पष्ट झाले, की करिश्मा डबल गेम खेळत आहे आणि घरातील सदस्यांना इशारा देत आहे. आता ही 'बिग बॉस'ची कार्यवाही आहे, की गेमचा भाग, हे तर येणा-या एपिसोडमध्येच कळेल.
प्रणित, पुनीत आणि प्रीतम बनले लोकांचे आवडते सदस्य
काम्या आणि अँडीने हाऊसमेट्सला हेदेखील सांगण्यात आले, की प्रणित, प्रीतम आणि पुनीत लोकांचे आवडते सदस्य बनले आहे, जे योग्य आहेत. या तिन्ही सदस्यांनी संतुलीत गेम खेळला आहे. प्रणित भट्ट सुरुवातीला बंडखोर वाटत होता, आता तो सांभाळून गेम खेळत आहे. प्रीतम आणि पुनीतसोबतसुध्दा आहेत, मात्र काम्या आणि अँडीने दोघांना नाते निभावण्यापेक्षा खेळावर लक्ष देण्यास सांगितले आहे. आम्ही यापूर्वीही सांगितले होते, की पुनीतला त्याचे नाते महागात पडू शकते. असो, सुकिर्ती जाता-जाता प्रणितला गुलामीपासून वाचवून गेली.
करिश्मा बनली नवीन खलनायक
करिश्मा पहिल्या दिवसापासून स्वत:ला हाऊसमेट्समध्ये सर्वात उत्कृष्ट सदस्य समजत आली आहे. काम्या आणि अँडीनेसुध्दा करिश्माला खडसावले आणि सांगितले, की तिने गौतमच्या सॉरीलासुध्दा स्वत:च्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला. तिने त्याचा फायदा गेममध्ये घेण्याचा प्रयत्न केला. करिश्माचा दावा उलटा पडला, परंतु गौतम त्यामुळे हीरो बनला. त्यानंतर सलमान म्हणाला, की गौतम एक मजबूत स्पर्धक आहे. म्हणून करिश्माने गेम प्लॅन केला. आपली पोल उघड पडत असल्याचे पाहून करिश्मा केवळ चेह-यावर हावभाव व्यक्त करत राहिली. दुसरीकडे, मिनिषाचा हळू-हळू धूसफुस सुरु झाली आहे.
सोमवारी बसेल झटका
यावेळी नॉमिनेशनची प्रक्रिया आठवड्याच्या शेवटी होण्याऐवजी सुरुवातीला होत आहे. अशात, आठवड्याच्या सुरुवातीपासूनच घरात झोंबणारे वातावरण पाहायला मिळू शकते. घरात गौतम टिकून राहिल्याने करिश्माच्या खेळावर पाणी फेरले आहे. एकिकडे, मिनिषासुध्दा करिश्माशी खुष नाहीये. सोनी सिंह, गौतम, प्रीतम आणि प्रणित सुरुवातीपासूनच दूरावा ठेवून आहेत. सध्या तर घरात सदस्यांमध्ये मतभेद वाढत आहेत.
पुनीत इस्सरचा बिनधास्त डान्स
सुकिर्तीच्या एविक्शनवर सलमान खानने पुनीत इस्सरला 'किक'चे गाणे 'जुम्मे की रात...'वर डान्स करायला सांगितला. पुनीत पटकन उठला आणि नाचायला लागला. त्यानंतर पुनीत इतका नाचला जसे, की खूप वर्षांनी त्याला डान्स करायची संधी मिळाली होती. पुनीतने सलमानच्या स्टेप्स हूबेहूब कॉपी केल्या आणि लोकांच्या त्या आवडल्यादेखील.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा Day 14ची काही छायाचित्रे...