आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Karishma Tanna Roamnce Continue With Upen Patel In Bigg Boss

Video: बिग बॉसमध्ये राहुल महाजनवर भडकली करिश्मा, डिंपीच्या डोळ्यांत अश्रू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बिग बॉसच्या घरातील 'हल्लाबोल' सिरिजचा 11 वा दिवस ड्रामा, इमोशन आणि रोमान्सने भरलेला राहिला. लग्झरी बजेट टास्क 'बिग बॉस का कॉल सेंटर' दरम्यान करिश्मा तन्ना हिने राहुल महाजन याच्यावर जोरदार भडास काढली. गेल्या वर्षी एक अॅपिसोडमध्ये राहुलने असे म्हटले होते, की सहा वर्षांपासून तो करिश्माच्या मागे आहे. राहुलच्या याच वक्तव्यावर करिश्मा भडकली होती. त्यामुळे लग्झरी बजेट टास्क दरम्यान तिने राहुलवर भडास काढली. तिने राहुलाला सरळ विचारले, की जर गेल्या सहा वर्षांपासून माझ्या मागे होते तर डिंपीसोबत लग्न का केले. राहुलने माझ्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवली आहे आणि राष्ट्रीय टेलिव्हिजनवर माझी खिल्ली उडवली आहे, असा आरोपही करिश्माने लावला आहे. मी केवळ मस्करी करीत होतो, असे सांगून राहुलने माफी मागितली. पण करिश्माने राहुलवर आपला राग काढल्याने डिंपी मात्र दुःखी झाली. राहुलला बिलगून ती रडू लागली. डिंपीच्या भावना बघून गौतम, संभावना आणि सना पुढे सरसावल्या. त्यांनी डिंपीला आधार दिला. मी केवळ माझी भूमिका मांडत होती. त्यामुळे राहुलला रागवावे लागले, असे करिश्मा यावेळी म्हणाली. पण आता डिंपी आणि करिश्मामध्ये मैत्री राहिलेली नाही, असे डिंपीच्या वर्तनावरुन जाणवत होते.
हल्लाबोल सिरिजची दुसरी बदली
बिंग बॉसची कॅप्टन करिश्माने विचारले, की लग्झरी बजेट टास्कमध्ये कोण विजयी होणार... करिश्माच्या विचारांप्रमाणे, चॅलेंजर्स टीमचा या विजय झाला आहे. त्यानंतर बिग बॉसने चॅलेंजर्स टीमला एक नाव सिलेक्ट करण्यास सांगितले होते. या टास्कमध्ये ज्याचा परफॉर्मन्स चांगला राहिला, असे नाव सांगण्यास सांगितले होते. पण या टीममध्ये एकमत झाले नाही. त्यानंतर बिग बॉसने संभावनाला एका नाव सांगण्यास सांगण्यात आले. यावेळी तिने स्वतःचे नाव घेतले. करिश्माने डिंपीचे नाव घेतले. बदलीच्या अंतर्गत आता संभावना चॅम्पिअन्स आणि डिंपी चॅलेंजर्स टीममध्ये गेली आहे.
हमारा दिल आपके पास हैं...
गुरुवारच्या अॅपिसोडमध्ये करिश्मा आणि उपेन रोमान्स करताना दिसले होते. उपेनने करिश्माला प्रपोज केले आणि म्हटले, की हमारा दिल आपके पास हैं... यावेळी त्याने विचारले, की तुम्हाला दिल किसके पास हैं... तेव्हा करिश्माने मान्य केले, की ती उपेनवर प्रेम करते... मला जसा मुलगा हवा होता तो तू आहेस, असे करिश्माने यावेळी कबुल केले...
पुढील स्लाईडवर बघा, बिग बॉस हल्लाबोल सिरिजच्या 11 व्या दिवसाची झलक फोटोंमध्ये...