आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
टीव्ही इंडस्ट्रीतील हॉट पॉप्युलर जोडी कश्मिरा शाह आणि कृष्णा अभिषेकच्या अफेअरला जवळपास सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. ग्लॅमर जगतात नाते जास्त काळ टिकून राहात नाही. मात्र कृष्णा आणि कश्मिरा त्याला अपवाद आहेत.
एवढ्या वर्षांनंतरही कृष्णा आणि कश्मिरा यांच्या प्रेमाचा धागा कायम आहे. मात्र या दोघांची प्रेमकहाणी कशी सुरु झाली हे फारच थोड्या जणांना ठाऊक आहे. याविषयी कश्मिरालाच विचारल्यावर तिने आपली लव्ह स्टोरी आम्हाला सांगितली. कश्मिराने सांगितले, ''पहिल्या भेटीतच आम्ही दोघेही शारीरिकरित्या एकमेकांकडे आकर्षित झालो होतो. त्यामुळे आमची पहिलीच भेट वन नाईट स्टॅण्डमध्ये बदलली.''
कॅश सांगते, ''आमची पहिली भेट 'पप्पू मिल गया' या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. रात्रीची वेळ होती. चित्रपटाचे दिग्दर्शक सजन सोनीजी माझ्याकडे चित्रपटाची ऑफर घेऊन आले. माझ्या अपोझिट कृष्णा असल्याचे सजन यांनी सांगितले आणि त्यांनी माझी भेट कृष्णाशी घडवून दिली.''
कृष्णाने त्या रात्रीच्या आठवणीत रमताना सांगितले, ''आमच्या प्रेमाला सुरुवात ही व्हॅनिटी व्हॅनमध्ये झाली. रात्र झाली होती आणि आम्ही दोघेही व्हॅनमध्ये बसलो होतो. तेव्हा अचानक लाईट गेली. मी कॅशला विचारले, आता काय करुया. कॅशने मला पुन्हा विचारले, का काही करायचे आहे का ? अशाप्रकारे आम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमात पडलो.''
कश्मिरा शाह म्हणते, मी तणावमुक्तीसाठी सेक्स करते
कश्मिरा शहा स्पर्धकांना देते मारहाणीचे धडे
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.