आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'केबीसी\'चा शेवटचा एपिसोड 26 जानेवारीला होणार टेलिकास्ट, बिग बी झाले भावूक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महानायक अमिताभ बच्चन यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणणार्‍या ‘कौन बनेगा करोडपती’ या शोच्या सहाव्या सिझनचा शेवटचा भाग 26 जानेवारी रोजी प्रसारित करण्यात येणार आहे. ‘या शेवटच्या भागाचे चित्रीकरण झाल्यानंतर दु:ख वाटत असले तरी मला केबीसी करण्यासाठी विचारले तर मी पुन्हा हा शो करेल. तुमची रजा घेताना मी खूपच उदास झालोय. हे दुःख मी शब्दांत व्यक्त करु शकत नाहीये. सगळ्या प्रेक्षकांचे मनापासून धन्यवाद. लवकरच भेटू ही आशा मी व्यक्त करतो.'', असे अमिताभ यांनी ब्लॉगवर म्हटले आहे.

तिसर्‍या भागाचा अपवाद वगळता पाचही शोमध्ये अमिताभ यांनी सूत्रसंचालन करून रसिकांच्या मनावर जादू केली होती. तिसर्‍या भागाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी शाहरुखने सांभाळली होती.

‘एबीसीएल’ कंपनी डबघाईला आल्यानंतर बच्चन आपल्या कारर्कीदीत झगडत असताना ‘केबीसी’ या शोने त्यांना पुन्हा त्याच उंचीवर नेऊन ठेवले होते.

बिग बींनी शेवटच्या एपिसोडची काही छायाचित्रे आपल्या फेसबूक पेजवर अपलोड केली आहेत. केबीसीच्या सहाव्या सिझनची सुरुवात गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात झाली होती. सहाव्या भागात मुंबईच्या सन्मीत कौर यांनी पाच कोटींचे बक्षीस जिंकले होते.