आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'चंद्रमुखी चौटाला'ने बॉयफ्रेंडसोबत तोडले नाते, लग्नाच्या विरोधात होते पालक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवाब शाहसोबत कविता कौशिक - Divya Marathi
नवाब शाहसोबत कविता कौशिक
मुंबई: लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आणि एफआयआरची 'चंद्रमुखी चौटाला' अर्थातच कविता कौशिकचे बॉयफ्रेंड नवाब शाहसोबत ब्रेकअप झाले आहे. बातमी आहे, की कविताने नवाबपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि आता ती सिंगल आहे. कविताच्या सांगण्यानुसार, ती लव्हलाइफपासून ब्रेक घेऊन करिअरवर लक्ष देणार आहे. एका प्रसिध्द पोर्टलनुसार, दोघे एकमेकांना स्पेस देणार आहेत.
कवितापेक्षा 9 वर्षांनी मोठा आहे नवाब शाह...
कवित आणि नवाबमध्ये 9 वर्षांचे अंतर आहे. नवाब शाहने अनेक मोठ्या सिनेमांत काम केले आहे. तो सलमान खानच्या 'बॉडीगार्ड'मध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता. याशिवाय, ‘डॉन 2’, ‘भाग मिल्खा भाग’ आणि शाहरुख खानच्या ‘दिलवाले’ सिनेमांत झळकलेला आहे.
लग्नाच्या विरोधात का आहेत कविताचे पालक...
कविताला तिच्या पालकांच्या विचाराचे आश्चर्य वाटत आहे. तिच्या सांगण्यानुसार, 'माझे वडील या लग्नाच्या विरोधात आहेत, कारण आमचे धर्म वेगळे आहेत. ही खरंच खंत करण्याची गोष्ट आहे. लोक आजही अशाच गोष्टींवर विश्वास ठेवतात.' कविता हिंदू आणि तिचा बॉयफ्रेंड मुस्लिम आहे. कविताच्या वडिलांची ईच्छा नाहीये, की मुलीने एका मुस्लिम मुलासोबत लग्न करावे. कविताचे म्हणणे आहे, की मी माझ्या आई-वडिलांवर खूप प्रेम करते. मला या जगात त्यांच्या पेक्षा जास्त कुणीच महत्वाचे नाहीये. मी कधीच त्यांच्या विरोधात जाऊन लग्न करणार नाही.
'एफआईआर’मधून झाली लोकप्रिय...
कविताने अनेक टीव्ही मालिकांत काम केले असले तरी तिला 'एफआईआर’ मालिकेतून लोकप्रियता मिळाली. या शोमध्ये तिने हरियाणवी पोलिस इंस्पेक्टर चंद्रमुखी चौटालाचे पात्र साकारले होते. 2013मध्ये तिने हा शो सोडला. परंतु प्रेक्षकांच्या मागणीनंतर तिला पुनरागमन करावे लागले होते.
बॉलिवूडमध्ये एंट्री...
अनेक टीव्ही मालिकांत काम केलेल्या कविताचे सिनेमांतसुध्दा काम केले आहे. ती 'एक हसीना थी' (2004), 'मुंबई कटिंग' (2009), 'फिल्म सिटी' (2011) आणि 'जंजीर' (2013) सिनेमांत झळकली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा Ex-Boyfriend नवाब शाह आणि कविता कौशिकचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...