आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या एका अटीवर 9 वर्षे मोठ्या बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार 'चंद्रमुखी चौटाला'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वडिलांसोबत कविता, दुस-या फोटोमध्ये नवाब शाहसोबत कविता कौशिक - Divya Marathi
वडिलांसोबत कविता, दुस-या फोटोमध्ये नवाब शाहसोबत कविता कौशिक
मुंबई: 'एफआईआर’ मालिकेतील चंद्रमुखी चौटाला अर्थातच कविता कौशिक बॉयफ्रेंड नवाब शाहसोबत लग्न करणार आहे. परंतु लग्नासाठी तिने एक अट ठेवली आहे. कविताचे म्हणणे आहे, की जोपर्यंत तिचे कुटुंबीय या लग्नासाठी तयार होत नाहीत, तोपर्यंत ती लग्न करणार नाहीये.
का वडिलांच्या मनाविरुध्द लग्न करणार नाही कविता?
एका वेबसाइटवर आलेल्या बातमीनुसार, कविता हिंदू आणि तिचा बॉयफ्रेंड मुस्लिम आहे. कविताच्या वडिलांची ईच्छा नाहीये, की मुलीने एका मुस्लिम मुलासोबत लग्न करावे. कविताचे म्हणणे आहे, की मी माझ्या आई-वडिलांवर खूप प्रेम करते. मला या जगात त्यांच्या पेक्षा जास्त कुणीच महत्वाचे नाहीये. मी कधीच त्यांच्या विरोधात जाऊन लग्न करणार नाही.
कवितापेक्षा 9 वर्षांनी मोठा आहे नवाब...
कविताच्या सांगण्यानुसार, माझ्यात आणि नवाबमध्ये 9 वर्षांचे अंतर आहे. मी पूर्वी खूप शार्ट टेम्पर्ड आणि सेल्फिश होते. नवाबमुळे मी बदलले आणि माझ्या चुका मला कळू लागल्या आहेत.
पालकांच्या विचाराने हैराण झालीये कविता...
कविताला तिच्या पालकांच्या विचाराचे आश्चर्य वाटत आहे. तिच्या सांगण्यानुसार, 'माझे वडील या लग्नाच्या विरोधात आहेत, कारण आमचे धर्म वेगळे आहेत. ही खरंच खंत करण्याची गोष्ट आहे. लोक आजही अशाच गोष्टींवर विश्वास ठेवतात.'
कोण आहे कविताचा बॉयफ्रेंड नवाब शाह...
नवाब शाहने अनेक मोठ्या सिनेमांत काम केले आहे. तो सलमान खानच्या 'बॉडीगार्ड'मध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता. याशिवाय, ‘डॉन 2’, ‘भाग मिल्खा भाग’ आणि शाहरुख खानच्या ‘दिलवाले’ सिनेमांत झळकलेला आहे.
'एफआईआर’मधून झाली लोकप्रिय...
कविताने अनेक टीव्ही मालिकांत काम केले असले तरी तिला 'एफआईआर’ मालिकेतून लोकप्रियता मिळाली. या शोमध्ये तिने हरियाणवी पोलिस इंस्पेक्टर चंद्रमुखी चौटालाचे पात्र साकारले होते. 2013मध्ये तिने हा शो सोडला. परंतु प्रेक्षकांच्या मागणीनंतर तिला पुनरागमन करावे लागले होते.
बॉलिवूडमध्ये एंट्री...
अनेक टीव्ही मालिकांत काम केलेल्या कविताचे सिनेमांतसुध्दा काम केले आहे. ती 'एक हसीना थी' (2004), 'मुंबई कटिंग' (2009), 'फिल्म सिटी' (2011) आणि 'जंजीर' (2013) सिनेमांत झळकली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कविताचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...