आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैसा आला, पण लक्ष्मी गमावली; \'केबीसी\'च्या कोट्यधिशाला पत्नीने दिला घटस्फोट

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा (बिहार)- टीव्ही रियालिटी शो 'कौन बनेगा करोडपती'चे (केबीसी-5) विजेते अनिल कुमार सिन्हा यांचे कौटुंबीक जीवन धोक्यात आले आहे. त्यांच्या पत्नीने त्यांना घटस्फोट देऊन चक्क दुसरे लग्न रचले आहे. भरीस भर 'केबीसी'मध्ये मिळालेल्या यशामुळे पत्नीने घटस्फोट दिल्याचा खुलासा करून सिन्हा यांनी खळबळ उडवून दिली आहे.

एखाद्या व्यक्तीकडे कोट्यवधी रुपये आले, की इतर व्यक्ती त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतात. परंतु, सिन्हा यांच्या बाबतीत मात्र उलटेच झाले आहे. घरी लक्ष्मीची पावले उमटली असताना त्यांच्या घरातील खरी खुरी लक्ष्मी त्यांना सोडून गेली आहे.

पत्नीने घटस्फोट दिल्याचे वृत्त सिन्हा यांनी बरेच दिवस लपवून ठेवले होते. आता त्यांच्या पत्नीने दुसरे लग्न रचले असल्याने त्यांनी याचा खुलासा केला आहे. 'केबीसी'मधून बोलविणे आले तेव्हापासून दोघांमध्ये खटके उडण्यास सुरवात झाली होती, असे सिन्हा यांनी सांगितले आहे. असे झाल्याने ते पत्नीला 'केबीसी'च्या सेटवर घेऊन येऊ शकले नाहीत. ते विजयी झाल्यावर सगळ्या बिहारमध्ये आनंदाचे वातावरण होते. परंतु, हा आनंद साजरा करायला त्यांची पत्नी त्यांच्यासोबत नव्हती.

वाचा एका वर्षापर्यंत सिन्हा यांनी कसा पुढे ढकलला घटस्फोट... पुढील स्लाईडला क्लिक करा...