फोटो: अमिताभ बच्चन यांच्या हस्ते 7 कोटींचा चेक घेताना अचिन आणि सार्थक
नवी दिल्ली- 'कौन बनेगा करोडपती' (KBC)च्या आठव्या पर्वात दिल्लीच्या दोन भावांनी 7 कोटी रुपये जिंकले. अचिन आणि सार्थक नरुला हे गेम शोच्या स्पेशल एपिसोडमध्ये 14 प्रश्नांची उत्तरे देऊन महाकरोडपती ठरले. ही रक्कम भारतात होणा-या सर्व गेम शोमधील जिंकलेली सर्वात मोठी रक्कम आहे. त्यांच्या या वियजावर
अमिताभ बच्चन यांनी सांगितले दोघांनी शोमध्ये खेळाचे शानदार प्रदर्शन केले आहे. दोघे खूपच प्रतिभाशाली आहेत.
महाकरोडपती बनण्याचा प्रवास
अचिन मार्केटिंग मॅनेजर आहे आणि त्याचा भाऊ सार्थक शिक्षण घेत आहे. अचिन मागील 10 वर्षांपासून
केबीसीमध्ये येण्याचा प्रयत्न करत होता. मागील तीन वर्षांपासून तो फायनल स्पर्धकांच्या यादीत येता-येता राहिला. यावेळी त्याला संधी मिळाली. त्याने 7 कोटी रुपये जिंकून संधीचे सोने केले आहे. अचिन म्हणाला, त्याने केबीसीचे प्रत्येक पर्वाचे एपिसोड बघितले आहेत. हॉट सीटवर बसण्यापूर्वी त्याने खूप तयारी केली. त्यामध्ये त्याने सामान्य ज्ञान असलेली अनेक पुस्तके वाचली. शिवाय, दोन्ही भावांनी शोमध्ये आत्मविश्वासाने सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. 7 कोटींपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी लाइफ लाइनचासुध्दा वापर केला.
आईवर उपचार करणार
या जिंकलेल्या रकमेचा वापर कॅन्सरने त्रस्त असलेल्या आईवर उपचार करणार असल्याचे दोन्ही भावांनी सांगितले. सोबतच, 7 कोटींची मदतीने विकलेले घरसुध्दा परत मिळवण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यांच्या वडिलांना व्यवसायात तोटा झाल्यानंतर त्यांनी राहते घर विकले होते.
अमिताभ यांनी केली प्रशंसा
सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी नरुला भावांची खूप प्रशंसा केली. ते म्हणाले, 'दोघे भाऊ खूप शानदार पध्दतीने खेळत होते. दोघे कोणत्याही लाइफ लाइनशिवाय हा शो जिंकू शकले असते इतका आत्मविश्वास त्यांच्यात दिसून येत होता. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरापूर्वी त्यांचे जे तर्क होते, त्याने खूप प्रभावित झालो.'
निर्मातेसुध्दा झाले आनंदी
या शोचे निर्माते सिध्दार्थ बसु यांनी सांगितले, 'आम्ही अशा क्षणाची प्रतिक्षा शो सुरु झाल्यापासून करत होतो. अचिन आणि सार्थक यांनी शोचा प्रवास पूर्ण केला याचा आम्हाला आनंद आहे.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शोदरम्यानची काही खास छायाचित्रे...