आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्थिक तंगीला सामोरे जातोय 'KBC'मधून 5 कोटी जिंकणारा सुशील कुमार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बातम्यांनुसार, 'कौन बनेगा करोडपती' शोमधून 5 कोटींची रक्कम जिंकणारा सुशील कुमार आज अर्थिक तंगीला सामोरे जात आहे. मोतिहारी, बिहारचा रहिवासी सुशील कुमारने 2011मध्ये 'कौन बनेगा करोडपती' शोमध्ये सर्व प्रश्नांची योग्य उत्तरे देऊन 5 कोटी रुपये जिंकले होते. तो जेव्हा या शोमध्ये भाग घेण्यास पोहोचला तेव्हा तो मोतिहारीमध्ये कम्प्यूचर ऑपरेटर म्हणून काम करत होता. केबीसी जिंकल्यानंतर सुशील ग्रामीण विकास मंत्रालयाचा ब्रँड अॅम्बेसेडर झाला. मात्र, सध्या तो बेरोजगार असल्याचे सांगितले जात आहे.
सिव्हिल सेवेची तयारीसुध्दा राहिली अर्धवट-
केबीसीदरम्यान सुशील कुमारने सांगितले होते, की त्याला सिव्हिल परिक्षेची तयारी करायची आहे आणि त्यासाठी दिल्लीला जायचे आहे. परंतु त्याचे हे स्वप्नसुध्दा अर्धे राहिले.
'केबीसी'मधून मिळाले 3.6 कोटी-
सुशील कुमारने पाचवे पर्व जिंकले तेव्हा त्याला 5 कोटी रुपये मिळाले होते. परंतु इनकम टॅक्स कापून त्याच्या हातात केवळ 3.6 कोटी रुपये आले. या रक्कमेमध्ये त्याने काही पैसे आपल्या घरासाठी तर काही भावांच्या व्यवसायासाठी खर्च केले. उरलेले पैसे त्याने बँकेत जमा केले, त्या पैशांच्या व्याजावर त्याच्या घराचा उदरनिर्वाह चालू होता. मात्र सुशीलकडे आता केवळ थोडीच रक्कम शिल्लक राहिली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सुशील कुमारची केबीसीमधील काही छायाचित्रे...