आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 'Khatron Ke Khiladi' Rohit Became The Host Of Meet The 12 Participants

'खतरो के खिलाडी'च्या पाचव्या पर्वाचा होस्ट झाला रोहित शेट्टी, भेटा 12 स्पर्धकांना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॉमेडी आणि अ‍ॅक्शन सिनेमांना उत्कृष्ट दृष्टिकोण देणारा रोहित शेट्टी आता टीव्ही शो 'खतरो के खिलाडी'मध्ये दिसणार आहे. रोहितला या शोच्या पाचव्या पर्वासाठी होस्ट बनवण्यात आले आहे. 31 जानेवारीला मुंबई येथे झालेल्या एका कार्यक्रमामध्ये या शोच्या सर्व स्पर्धकांची घोषणा करण्यात आली. रोहितला 100 कोटींची कमाई करणा-या सिनेमांच्या दिग्दर्शकाच्या रुपात बघितले जाते, म्हणून 'खतरो के खिलाडी' शोसाठी रोहितकडून अनेक अपेक्षा आहेत. म्हणजेच, यावेळी या शोमध्ये स्टंट, थ्रिल आणि सोबतच कॉमेडीसुध्दा प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. विशेष म्हणजे, 'खतरो के खिलाडी'ला यावेळी 'डर का ब्लॉकबस्टर' नाव देण्यात आले आहे.
रोहित पहिल्यांदा हा शो होस्ट करत आहे, याविषयी त्याने सांगितले, की जेव्हा तो 'गोलमाल', 'बोल बच्चन' बनवत होता, तेव्हा वाटले नव्हते हे सिनेमे कोटींची कमाई करू शकतील. परंतु असे झाले. तसेच, त्याने 'खतरो के खिलाडी'कडून कोणत्याच अपेक्षा ठेवलेल्या नाहीत. त्याला वाटते, की हा शोसुध्दा लोकांच्या पसंतीस पडेल. या कार्यक्रमाची शुटिंग दक्षिण अफ्रिकेच्या जंगलातील काही सुंदर ठिकाणी करण्यात आली आहे. सोबतच, याचे प्रिमिअर कलर्स चॅनलवर दाखवण्यात येतील.
अ‍ॅक्शन सीन्सने भरलेल्या 'खतरो के खिलाडी 5' या शोमध्ये 12 स्पर्धक सहभागी होणार आहेत. त्यामध्ये बॉलिवूड अभिनेता रणवीर शौरी, रजनीश दुग्गल, गौहर खान, कुशाल टंडन, मुग्धा गोडसे, रॉशेल मारिआ राव, निकेतिन धीर, दयानंद शेट्टी, सलमान यूसुफ खान, माही विज, पूजा आणि गीता टंडन यांनी सहभाग घेतला आहे. 'खतरो के खिलाडी'चे पहिले आणि दुसरे पर्व अक्षय कुमारने होस्ट केले होते आणि तिसरे पर्व प्रियांका चोप्राने होस्ट केले होते. चौथ्या पर्वासाठी पुन्हा एकदा अक्षय कुमारला होस्टिंगसाठी निवडण्यात आले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा छायाचित्रांमध्ये रोहितचे स्टंट आणि 'खतरो के खिलाडी'चे स्पर्धक...