आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुनील-अलीनंतर या \'बंपर\' कलाकाराचा \'द कपिल शर्मा शो\'ला रामराम, सुरु करणार नवीन शो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सुनील ग्रोवर, अली असगर आणि सुगंधा मिश्रानंतर अजून एका मुख्य कलाकाराने कपिल शर्माचा साथ सोडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 'द कपिल शर्मा शो' मध्ये बम्पर नर्सची भूमिका करणाऱ्या किकु शारदानेही शोला अलविदा केला आहे. किकु लवकरच  जॉनी लिव्हरसोबत कॉमेडी शो घेऊन येत आहेत. ज्याची शूटिंग सप्टेंबरमध्ये सुरु होऊ शकते. स्वतः किकूने सांगितले की, पहिले मी कपिलबरोबरच एखादा नवीन शो सुरु करावा असा विचार करत होतो पण आता मी असा निर्णय घेतला आहे की नवीन शोवर लक्ष देईल. 4 वर्षापासून कपिलसोबत आहे किकू..
 
- किकूला एंचरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये काम करुन 16 वर्षाहून जास्त काळ झाला आहे. त्याने आतापर्यंत 'द ग्रेट इंडियन कॉमेडी शो' (2004-05), 'FIR' (2006-15) आणि 'अकबर-बीरबल' (2014-16) यांसारख्या कार्यक्रमात काम केले आहे. 
-  मागील चार वर्षापासून किकू कपिलच्या शोमध्ये काम करत आहे. 2013 ते 2016 पासून 'कॉमेडी नाइट विद कपिल' मध्ये  किकू काम करत आहे. 
- 'द कपिल शर्मा शो' काही दिवसांकरता बंद करण्यात आला आहे. लवकरच नव्या फॉर्मॅटसोबत तो वापस येण्याची शक्यता आहे. तर काहीजणांनी शो कायमचा बंद झाला आहे असे वर्तवले आहे. 
 
नेहमी दिली कपिलची साथ..
- किकू शारदा कपिलच्या विश्वासु व्यक्तींपैकी एक आहे. किकूने नेहमीच कपिलला साथ दिली आहे. जेव्हा  अली असगर, सुगंधा मिश्रा, डॉ. संकेत भोसले या सर्वांनी कपिलचा शो सोडला त्यावेळी किकू एकमेव असा होता जो कपिलसोबत उभा राहिला. 
 
सब टीव्हीवर येणार किकूचा नवा शो..
- कीकू शारदा नवीन कॉमेडी शो 'पार्टनर' मध्ये दिसणार आहे जो सब टीव्हीवर टेलिकास्ट होईल. या शो ला पारितोष पेंटर डायरेक्ट करणार आहे. 

पुढच्या स्लाईडवर पाहा, या दोन भूमिकांनीही फेमस झाले किकू शारदा..
बातम्या आणखी आहेत...