आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्या राम रहीममुळे खाल्ली तुरुंगाची हवा, किकू शारदाने त्याचीच उडवली खिल्ली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - बाबा राम रहीम याला शिक्षा झाल्यानंतर विविध वर्गांतून वेगवेगळ्या प्रतिक्रिया यायला लागल्या आहेत. एकिकडे त्याचे अनुयायी या निर्णयावर नाराजी व्यक्त करत आहेत. तर देशातील मोठ्या वर्गाकडून या शिक्षेचे स्वागत होताना दिसत आहे. मात्र एक व्यक्ती असा आहे ज्याने या शिक्षेवर अत्यंत खोचक अशी प्रतिक्रिया दिली आणि त्याचे कारणही तसेच आहे. हा व्यक्ती म्हणजे द कपिल शर्मा शो मधील बंपर साकारणारा कॉमेडियन किकू शारदा. 

राम रहीममुळे खाल्ली तुरुंगाची हवा..
एका शोमध्ये किकू शारदा याने राम रहीमचे पात्र साकारत कॉमेडी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर राम रहीमच्या भक्तांनी त्याचा विरोध केला आणि धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपात किकू शारदाला अटकही झाली होती. 
 
अशी दिली प्रतिक्रिया..
जेव्हा राम रहीमला शिक्षा सुनावण्यात आली त्यानंतर किकू शारदाने एक ट्वीट केले.. Enjoying a peaceful Chinese meal with no monosodium glutamate.. असे ते ट्वीट होते. या ट्वीटचा अर्थ मी एका रेस्तरॉमध्ये आरामात जेवत आहे आणि जेवणात जराही मोनोसोडियम ग्लुटामेट नाही असे त्याने लिहिले होते. मोनोसोडियम ग्लुटामेटला MSG असे म्हटले जाते आणि बाबा राम रहीमलाही त्याचे भक्त MSDG म्हणतात. असाप्रकारे किकूने चिमटा काढत त्याची भावना व्यक्त केली. 

किकू शारदाचे ट्वीट आणि त्यावर ट्विंकलने दिलेली प्रतिक्रिया.. पुढील स्लाइडवर...
बातम्या आणखी आहेत...