आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kim Kardashian Demands Approximately 70 Lakhs Per Episode.

किमने एका एपिसोडसाठी मागितले 70 लाख, जाणून घ्या परदेशी सेलेब्सची 'बिग बॉस'मधील कमाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- किम कर्दाशिअन)
मुंबई- प्रसिध्द अमेरिकन टीव्ही स्टार किम कर्दाशिअन 'बिग बॉस'च्या घरात येणार असल्याच्या वार्ता माध्यमांमध्ये येत आहे. शोशी जोडलेल्या एका सूत्राच्या सांगण्यानुसार, की किम एक एपिसोडसाठी जवळपास 70 लाख रुपये घेणार आहे. मात्र, 'बिग बॉस' मेकर्स तिच्या या प्रस्तावावर सुरुवातीला सहमत नव्हते. परंतु शोचा टीआरपी वाढवण्यासाठी त्यांनी किमच्या या डिमांडवर विचार केला आहे.
सूत्रांनी सांगितले, 'शोचे निर्मात्यांनी सुरुवातीला किमशी संपर्क केला होता. परंतु तिची डिमांड आणि अटी पाहून ही चर्चा पुढे जाऊ शकली नाही. सध्या शोचा टीआरपी घसरला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा किमच्या नावाचा विचार केला जात आहे. दोघांमध्ये बातचीत सुरु आहे. मात्र, अद्याप काहीच ठरलेले नाहीये.'
'बिग बॉस'चे घर सरप्राइज घर आहे. परदेशी अभिनेत्री किम कर्दाशिअन या घराची पाहूणी बनली तर यापेक्षा मोठे सरप्राइज काय असणार. परंतु शोमध्ये तिची एंट्री सध्या केवळ चर्चा आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या 'बिग बॉस'च्या घरात आलेल्या परदेशी सेलेब्सना किती मानधान मिळाले...