आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bigg Bossमध्ये होऊ शकते या ग्लॅमरस हॉलिवूड बालाची एन्ट्री, जाणून घ्या ही आहे तरी कोण?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः किम कर्दाशियन)
मुंबईः 'बिग बॉस'च्या घरात आणखी एका नवीन पाहुण्याची एन्ट्री होण्याची दाट शक्यता आहे. ही नवी पाहुणी भारतीय नसून प्रसिद्ध अमेरिकन टीव्ही पर्सनॅलिटी किम कर्दाशियन आहे. अलीकडेच एका मॅगझिनसाठी टॉपलेस फोटोशूट करुन किम चर्चेत आली आहे. आता बातमी आहे, की बिग बॉसच्या निर्मात्यांनी किमला मोठ्या मानधनासह शोमध्ये सहभागी होण्याची ऑफर दिली आहे. मानधनाचा आकडा मोठा असल्यामुळे किम ही ऑफर नाकारु शकत नसल्याचे सूत्र सांगतात.
सूत्रांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, किमने निर्मात्यांना होकार दिला आहे, मात्र फायनल डील व्हायची आहे. सर्वकाही जुळून आल्यास येत्या 22 नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये किम घरात एन्ट्री करेल.
कोण आहे किम कर्दाशियनः
लॉस एंजिलिसमध्ये जन्मलेल्या 34 वर्षीय किमचे पूर्ण नाव किमबर्ली नॉएल कर्दाशियन आहे. टीव्ही पर्सनॅलिटीसोबतच तिला सोशलाइट, फॅशन डिझायनर, बिझनेसवुमन, मॉडेल आणि अभिनेत्रीच्या रुपात ओळखले जाते. तसे पाहता किम विशेषतः बोल्ड फोटोशूट्समुळे नेहमी चर्चेत येत असते. मात्र 2007 मध्ये ती एका सेक्स टेपमुळे चर्चेत आली होती. बॉयफ्रेंडसोबतची तिची ही सेक्स टेप 2003 मध्ये लीक झाली होती. मात्र 2007मध्ये तिला यासाठी कायदेशीर नोटीस मिळाली होती. याचवर्षी तिच्या 'किपिंग अप विथ द कर्दाशियन' या शोला भरपूर प्रसिद्धीसुद्धा मिळाली होती.
2010 मध्ये किम सर्वात महागडी रिअॅलिटी टीव्ही पर्सनॅलिटी ठरली होती. 2011 मध्ये तिने फुटबॉलपटू हम्फ्रीजसोबत लग्न केले होते. मात्र लग्नाच्या 72 दिवसांतच दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज केला होता. मात्र 2013मध्ये त्यांच्या घटस्फोटाला मंजुरी मिळाली होती.
याकाळात रॅपर केन्ये वेस्टसोबत तिचे सूत जुळले होते. 2013 मध्ये तिने केन्येच्या मुलीला जन्म दिला. तर 2014 मध्ये या दोघांनी लग्न केले. किमचे हे तिसरे लग्न आहे. तिचे पहिले लग्न 2000 मध्ये डोमन थॉमससोबत झाले होते. 2004मध्ये दोघांचा घटस्फोट झाला होता. 'डिजास्टर' (2008), 'बियॉन्ड द ब्रेक' (2009) आणि 'टेम्पटेशन' (2013) या हॉलिवूड सिनेमांमध्ये किम झळकली आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, किमची ग्लॅमरस झलक छायाचित्रांमध्ये...