आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकांनी तिरस्कार करावा -किरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मराठी थिएटरमधून करिअरची सुरुवात करणारे अभिनेता किरण करमरकर यांना ‘बदलते रिश्तों की दास्तान’ या मालिकेद्वारे स्वतःची ‘बॅड मॅन’ची इमेज तयार करायची आहे.

भूमिकेला जिवंत करणारे किरण करमरकर सुरुवातीपासूनच नकारात्मक भूमिका करू इच्छित होते. एका ब्रेकनंतर आता ते पुन्हा नकारात्मक भूमिकेत दिसणार आहेत. ‘बदलते रिश्तों की दास्तान’ या मालिकेत ते एका षड्यंत्रकारी, धूर्त, संधी साधू, चतुर आणि ईर्षा करणार्‍या व्यक्तीची भूमिका करत आहेत. ते आपल्या स्वार्थासाठी काहीही करायला तयार असतात.

या अभिनयामुळे लोकांनी मला तिरस्काराचे मेल करावेत अशी त्यांची इच्छा आहे. सासूपेक्षा जास्त सुनेचा छळ करणारे ते पहिलेच टीव्ही कलाकार आहेत. या मालिकेत संपूर्ण कुटुंब बलराजला घाबरत असते. तो खूपच कडक आणि शिस्तप्रिय आहे. त्याला मुलीपेक्षा मुले आवडतात, आणखीन मुले व्हावी अशी त्याची इच्छा असते. मुलींचे घराबाहेर पडणे त्याला आवडत नाही. तो आपल्या मुलींचा तिरस्कार करत असतो. तो खूप मोठा उद्योजक आहे. आपल्या कामासाठी तो कोणाचाही वापर करून घेतो. काम झाल्यावर त्यांना विसरून जातो. खरं तर अशा व्यक्तीची भूमिका केल्याने लोक खरंच त्यांना तिरस्काराचे मेल पाठवतील.