(संग्रहीत छायाचित्र- बॉयफ्रेंड नीरज खेमकासोबत दृष्टी धामी)
मुंबई- टीव्ही शो 'मधुबाला-एक इश्क एक जुनून'मधून ओळख मिळवणारी अभिनेत्री दृष्टी धामी 20 फेब्रुवारी एनआरआय बिझनेसमन आणि बॉयफ्रेंड नीरज खेमकासोबत लग्न करणार आहे.
बातम्यांनुसार, यांचे लग्न मुंबईमध्येच होऊ शकते. अभिनय आणि डान्सिंगमधून ओळख निर्माण करणारी दृष्टी धामी
आपल्या खासगी आयुष्याबाबत खूप कमी चर्चेत राहते. तरीदेखील दृष्टीचे नाव तिच्या सह-कलाकारांसोबत जुळले आहे.
दृष्टीचे नाव गुरमित चौधरी, सिध्दार्थ शुक्ला आणि कोरिओग्राफर सलमान युसूफसोबत जुळले होते. दृष्टी आपल्या सह-कलाकरांसोबत वाढलेली जवळीकमुळे अनेकदा तिचे बॉयफ्रेंड नीरजसोबत भांडण होत असे. दोघांच्या ब्रेकअपच्यासुध्दा बातम्या आल्या होत्या. मात्र, त्यांनी कधीच यावर स्पष्टीकरण दिले नाही.
चला जाणून घेऊया कोण-कोणत्या अभिनेत्यांसोबत होत्या दृष्टी धामीचे Affairsच्या चर्चा...