आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know About, How Is Comedian Bharti Singh In Real Life

कुटुंबीयांना आवडत नव्हते भारतीचे काम, जाणून घ्या कशी आहे खासगी आयुष्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका कॉमेडी शोदरम्यान आलिया भटसोबत भारती - Divya Marathi
एका कॉमेडी शोदरम्यान आलिया भटसोबत भारती
 
चंदीगढ: प्रसिध्द कॉमेडिअन भारती सिंह शनिवारी चंदीगढला आली होती. तिने आमच्या प्रतिनिधीसोबत खास बातचीत करून तिच्या खासगी आयुष्यातील काही रंजक गोष्टी शेअर केल्या. भारतीने सांगितले, की स्टँडअप कॉमेडिअन होण्याचे स्वप्न बाळगले, मात्र तिचे कुटुंबीयांचा याला सपोर्ट नव्हता. परंतु मी यशस्वी झाल्यानंतर परिस्थिती बदलली. वाचा कॉमेडिअन भारतीसोबत झालेल्या बातचीतचे काही अंश...
 
Q1. - खासगी आयुष्यातसुध्दा अशी खिल्ली उडवणे खूप हसायला आवडते, कि हे सर्व फक्त लोकांसाठी? 
- पर्सनल लाइफमध्ये मी शांत स्वभावाची आहे.
- मी घरीसुध्दा खूप शांत राहते. कारण घरी असते, तेव्हा झोपा काढते. हो, मी थोडी मुडी आहे. 
- नातेवाईक घरी येतात, तेव्हा त्यांच्यासोबत गप्पा आणि मस्ती करते. परंतु जास्तित जास्त शांतच असते. 
 
Q2. तू शोची तयारी कशी करते? 
- मी स्क्रिप्ट स्वत: लिहित नाही. आमचे लेखक लिहितात. परंतु माझ्या पहिल्या शोसाठी सर्व स्क्रिप्ट स्वत: लिहून आणली होती. 
- त्यानंतर कॉमेडी शोदरम्यान आम्हाला लेखक दिले जातात. 
- परंतु असे नाही, की सर्वकाही तेच करतात आणि आम्हाला काहीच माहित नसते. आम्ही सर्वजण मिळून काम करतो. 
 
घरच्यांना पसंत नव्हते काम...
- 8 वर्षांपूर्वी असा समाज नव्हता. सुरुवातीला घरचे लोक मूळीच आनंदी नव्हते. 
- ते म्हणायचे, ही मुलगी काय करतेय काय माहित. त्यांच्या नजरेत हे जोकरसारखे काम होते. 
- स्टँडअप कॉमेडीमध्ये मुले जे बोलू शकतात, ते मुली बोलू शकत नाही. 
- हा त्याकाळचा सर्वात मोठा गैरसमज होता. परंतु मी यशस्वी झाल्यानंतर हा गैरसमजसुध्दा दूर झाला. आता माझे कुटुंबीय मला पूर्ण सपोर्ट करतात. 
 
टीव्हीवर काम करायला आवडते...
Q3. टीव्हीवर यशस्वी झाल्यानंतर कलाकार सिनेमांकडे वळतात, तुझा काय विचार आहे?

- अद्याप माझा असा काहीच विचार नाहीये. कारण आता सिनेमांतील कलाकार टीव्हीवर काम करायला लागले आहेत. 
- टीव्हीच्या छोट्या पडद्यापर्यंत लोकांना पोहोचणे सोपे असते. 
- मोठ्या पडद्यापर्यंत जाण्यासाठी लोकांना 300-400 रुपये लागतात. तेव्हाच ते तिकीट खरेदी करून सिनेमा पाहू शकतात. 
- आज छोट्या पडद्यावर अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षितसारखे मोठे स्टार्स काम करत आहेत. 
- माझा असा काहीच विचार किंवा शौक नाहीये. 
- मात्र, चांगल्या सिनेमात दमदार भूमिका मिळाली तर नक्की जाईल. सध्या मी टीव्हीवर काम करून आनंदी आणि समाधानी आहे. 
 
शाहरुख-अमिताभसोबत केले आहे फ्लर्ट...
Q4. काही लोकांना वाटते, की तू कॉमेडी करता करता असभ्य आणि अभद्र पातळीवर येते. यावर तुझे काय मत आहे? 

- मूळीच नाही... कॉमेडी करताना माझ्यासमोर हँडसम हिरो येतो, तेव्हा मी त्यासोबत फ्लर्ट करते. 
- आजपर्यंत माझ्या कॉमेडीचे कुणाला वाईट वाटले नाहीये. मी शाहरुख खानपासून अमिताभ बच्चनपर्यंत सर्वांसोबत फ्लर्ट केले आहे. 
- मी लठ्ठ असल्याने माझे लग्न करत होत नाहीये. मी कधीच कुणासोबत खालच्या थरात बोलत नाही. 
- मुलगी होण्याच्या नात्याने मला माझ्या मर्यादा माहित आहेत. असे बोलणा-यांना एकच सांगेल, \'मी एक मुलगी आहे.\'
- जर मी असे केले असते आणि लोकांना ते आवडले नसते तर मी 9 वर्षे या इंडस्ट्रीत टिकलेच नसते. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कॉमेडिअन भारतीचे बॉलिवूड स्टार्ससोबतचे PHOTOS...