आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know About Tulip Joshi The Actress Of Tv Show Airlines

'मातृभूमी'मध्ये केले होते पाच भावांसोबत लग्न, आता 'एअरलाइन्स'मध्ये पायलट बनून उडवतेय विमान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(ट्युलिप जोशी 'एअरलाइन' टीव्ही शोमधील आणि दुस-या छायाचित्रात 'मातृभूमी' सिनेमातील ट्युलिप)
मुंबई: 2003मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मातृभूमी' सिनेमात कल्किचे पात्र साकारून अभिनेत्री ट्युलिप जोशीने पाच भावडांसोबत लग्न केले होते. तीच ट्युलिप जोशी स्टार प्लसवर प्रसारित होणा-या 'एअरलाइन्स' मालिकेत पायलट बनून विमान उडवताना दिसत आहे. तिच्या पात्राचे नाव अन्यना आहे. ट्युलिपने या शोमधून छोट्या पडद्यावर पाऊल ठेवले आहे. जाणून घेऊया तिच्याविषयी काही रंजक गोष्टी...
गुजराती वडील आणि अरमेनिअन आई
ट्युलिपचा जन्म 11 सप्टेंबर 1979मध्ये मुंबई येथे झाला. तिचे वडील गुजराती आणि आई अरमेनिअन आहेत. मुंबईच्या जमनबाई नरसी शाळेतून तिने शालेय शिक्षण घेतले. त्यानंतर विवेक कॉलेजमधून मजोरिंग फूड सायन्स अँड केमिस्ट्रीमधून पदवीशिक्षण पूर्ण केले. 2000मध्ये तिने फेमिना मिस इंडिया स्पर्धेत सहभाग घेतला. परंतु विजेत्यांमध्ये स्थान मिळवू शकली नाही. मात्र त्यानंतर तिला पाँड्स, सियाराम्स, पेप्सी आणि बीपीएलसारख्या प्रसिध्द ब्रँडच्या जाहिराती मिळाल्या.
बॉलिवूडमध्ये एंट्री-
ट्युलिपने 2002मध्ये 'मेरे यार की शादी है' सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली. निर्माता आदित्य चोप्रा एका मित्राच्या लग्नात गेले होत. तिथे त्यांनी ट्युलिपला पाहिले आणि या सिनेमनाचे ऑडिशन देण्याचा सल्ला दिला. मात्र त्यावेळी तिला हिंदी व्यवस्थित बोलता येत नव्हती. त्यामुळे तिला फिरोज खान यांच्या स्टुडिओमध्ये हिंदीची ट्रेनिंग देण्यात आल्याचे बोलले जाते. पुढील वर्षी अर्थातच 2003मध्ये तिला तेलगूच्या 'व्हिलेन' आणि हिंदीच्या 'मातृभूमी' सिनेमात काम मिळाले.
'मातृभूमी' बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला, पण सिनेमातील तिच्या पात्राची प्रशंसा झाली. 'मातृभूमी' हा स्त्रीभूण हत्येवर आधारित सिनेमा होता. त्यामध्ये भविष्यात लग्नासाठी जेव्हा तरुणी भेटणार नाहीत तेव्हा काय होईल याचे चित्र मांडण्यात आले होते. ट्युलिपने सिनेमात कल्किचे पात्र साकारले होते आणि एकाचवेळी पाच भावंडासोबत ती लग्न करते. या सिनेमात त्यांनी वाढत्या स्त्रीभूण हत्येचा विषय मांडून भविष्याचे वास्तव सांगितले होते.
बॉलिवूडच्या काही निवडक सिनेमांमध्ये ट्युलिपने केलेय काम-
'दिल मांगे मोर' (2004), 'शून्य' (2006), 'धोखा'(2007), 'कभी कही' (2007), 'सुपरस्टार' (2008), 'डॅडी कूल'(2009), 'रनवे' (2009), 'होस्टल' (2010) आणि 'बी केयरफुल' (2011)सारख्या बॉलिवूड सिनेमांमध्ये तिने काम केले. याशिवाय तेलगू, पंजाबी आणि कन्नडी भाषांमध्येसुध्दा काम केले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा ट्युलिप जोशीच्या खासगी आयुष्यातील काही निवडक छायाचित्रे...