आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एका एपिसोडसाठी 50 हजार रुपये मानधन घेते 'संध्या', ही आहे इतर अभिनेत्रींची Fees

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः दीपिका सिंह, हिना खान)
मुंबई - टीव्हीला नेहमी छोटा पडदा म्हटले जाते, मात्र या माध्यमात काम करणा-या
कलाकारांच्या कमाईचा आकडा मुळीच छोटा नाहीये. टीव्ही अभिनेत्री सून, पत्नी, सासू, वहिनीची भूमिका कौशल्याने साकारत असतात. साडी परिधान करुन तब्बल बारा तास मेकअपमध्ये राहतात. टीव्ही माध्यमात अभिनय करणा-या या अभिनेत्री विशेषतः ज्या आठवड्याचे सातही दिवस काम करतात, त्या एक मोठी रक्कम मानधनाच्या रुपात घेत असतात.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, टीव्ही अभिनेत्रींचे मानधन मालिका आणि वाहिनीवर आधारित असते. तसं पाहता अभिनेत्रींच्या मानधनाचा आकडा चार किंवा पाच आकडी असतो. जर एखाद्या अभिनेत्रीची मालिका प्राइम टाइममध्ये येत असेल आणि ती त्यात लीड रोलमध्ये असेल तर तिला 60 हजारांपासून ते एक लाखाच्या घरात मानधन मिळतं. हे मानधन आठ तासांच्या शिफ्टसाठी मिळतं.
सूत्र पुढे सांगतात, सर्वच कलाकारांचा शोशी संबधित प्रॉडक्शन हाउससोबत एक करार असतो. या करारानुसार, काही नियम आणि अटी असतात. त्यामध्ये महिन्यातील 20 ते 25 दिवस काम करण्याची अट सामील असते. या कलाकारांना सहसा त्यांचे मानधन चेकद्वारे दिले जाते.
एक नजर टाकुया प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रींच्या Per Episode Income वर:
खरे नाव : दीपिका सिंह
मालिकेतील नावः संध्या
मालिका : 'दीया और बाती हम'
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 'दीया और बाती हम'मध्ये संध्याची भूमिका वठवणारी दीपिका सिंह एका एपिसोडसाठी 40 ते 50 हजार रुपये मानधन घेते.
खरे नावः हिना खान
भूमिकेचे नावः अक्षरा
मालिकाः ये रिश्ता क्या कहलाता है
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेच्या प्रत्येक एपिसोडसाठी हिना खान 45 हजार रुपये मानधन घेते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, टीव्ही अभिनेत्री प्रत्येक एपिसोडसाठी किती मानधन घेते...