आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'बबिताजी\' आणि \'जेठालाल\'चे आहे जूने नाते, \'तारक मेहता\'चे Unknown Facts

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
\'तारक मेहता...\'चे मुख्य कलाकार - Divya Marathi
\'तारक मेहता...\'चे मुख्य कलाकार
अहमदाबाद: टेलीव्हिजनच्या जगात काही वर्षांपूर्वी सासू-सुनेच्या मालिका यशोशिखरावर पोहोचल्या होत्या. या मालिकांशिवाय दुसरी एकही मालिका भारतीयांच्या घरात चालू नसायची. पानाच्या दुकानांपासून रस्त्यावर, कॉलेज, शाळा आणि इतर सर्व ठिकाणी याच मालिकांची चर्चा असायची. त्याचदरम्यान एक मालिका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला आली. परंतु या मालिकेत ना सासू-सुनेचे भांडण होते, ना षडयंत्र. केवळ हस्य आणि हस्यच होते. या वेगळअया धाटणीच्या मालिकेचे नाव आहे 'तारक मेहता का उल्टा चश्मा'.
मालिकेची सुरुवात 28 जुलै 2008पासून झाली होती...
एक गोकुलधाम नावाची सोसायटी आणि त्यात राहणारे देशातील विविध राज्याचे लोक. यांची अफलातून केमिस्ट्री या मालिकेत दाखवण्यात येते. या मालिकेने सिध्द केले, की दुहेरी संवाद आणि अश्लिल भाषेशिवायसुध्दा कॉमेडी मालिका सुपरहिट होऊ शकते. या मालिकेची सुरुवात 28 जुलै 2008ला झाली होती. एपिसोडचा आकडा आता 2000च्या जवळपास गेला आहे. आजही या शोची लोकप्रियता जशाच तशी टिकून आहे.
गुजरातचे विनोदवीर लेखक तारक मेहता यांच्या प्रसिध्द 'दुनियाने ऊंधा चश्मा' मालिकेने प्रेरित ही मालिका गुजराती-कच्छी कुटुंबीयांच्या भोवती फिरणारी आहे. तरीदेखील ही मालिका केवळ गुजरातच नव्हे तर देशातील अनेक राज्यांमध्ये लोकप्रिय झाली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, मालिकेशी निगडीत रंजक गोष्टी...या गोष्टी कदाचित तुम्हाला ठाऊक नसतील...
बातम्या आणखी आहेत...