आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'दंगल\', \'..धोनी\'पेक्षा \'सचिन..\'मागेच; 27 कोटी कमावले, पण तेंडुलकरची फीसही निघाली नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सचिन तेंडुलकर. - Divya Marathi
सचिन तेंडुलकर.
मुंबई - सचिन तेंडुलकरवरील बायोग्राफिकल चित्रपट 'सचिन अ बिलियन ड्रीम्स' बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांच्या मते पहिल्या वीकेंडला चित्रपटाने 27.8 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाच्या सर्व व्हर्जनने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर शुक्रवारी 8.4 कोटी, शनिवारी 9.2 कोटी आणि रविवारी 10.2 कोटींचे कलेक्शन केले. मात्र 'दंगल' आणि 'धोनी'सारख्या खेळाडुंच्या बायोपिकच्या तुलनेत हा चित्रपट खूप मागे पडला आहे. (इतर बायोपिक्सची कमाई वाचा, पुढील स्लाइड्सवर)

कमाईतून अद्याप सचिनची फीसही निघाली नाही 
- रिपोर्ट्सनुसार सचिनने त्याच्या बायोग्राफिकल फिल्मसाठी फीस म्हणून सुमारे 40 कोटी रुपये घेतले आहेत. तप प्रोडक्शन हाऊसशी संबंधित सुत्रांच्या मते हा आकडा एकदम 40 कोटी तर नक्कीच नाही. हा आकडा 35 ते 38 कोटी असल्याची शक्यता आहे. 
- जेम्स एर्सकाइनच्या दिग्दर्शनात तयार झालेला हा चित्रपट हिंदीशिवाय मराठी, तमिळ, तेलुगू आणि इंग्रजीत रिलीज झाला. चित्रपट रवी भागचंदका आणि कार्निव्हल मोशन पिक्चर्सने 200 नॉटआऊट प्रोडक्शन बॅनर अंतर्गत तयार केला आहे. 

पुढील स्लाइड्सवर.. सातवा हायेस्ट वीकेंड ओपनर चित्रपट आहे, 'सचिन..'.. इतर खेळाडुंवरील बायोपिकने किती केली होती पहिल्या तीन दिवसांत कमाई...
 
बातम्या आणखी आहेत...