आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईला गेल्‍यानंतर असे बदलले या गावातील मुलाचे आयुष्‍य, जाणुन घ्‍या या स्‍टारविषयी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदीगड - 'वडीलांच्‍या मृत्‍यूनंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर आली. आईने दुसऱ्यांच्‍या घरी काम केले. तिसरीच्‍या वर्गात शिकत असताना मी गाण्‍यास सुरुवात केली. अनेकदा शाळेतही गात असे. यामुळे शिक्षकांचाही मी खुप लाडका बनलो होतो. त्‍यानंतर नोकरीसाठी मी अनेक ठिकाणी अर्ज दिले होते. मात्र कुठेच नोकरी मिळाली नाही. एके दिवशी मित्राने इंडियन ऑयडल बद्दल सांगितले आणि मी चंदीगडमध्‍ये ऑडीशन दिली.' या शब्‍दात 'इंडियन ऑयडल सीझन-9'चा उपविजेता खुदा बख्‍शने dainikbhaskar.comच्‍या ऑफीसमध्‍ये आपल्‍या भावना व्‍यक्‍त केल्‍या. तो पंजाबचा राहणारा आहे.  

ऑडिशनचा कठीण काळ
- चंदीगडमधील ऑडिशननंतर पुढील फेरीसाठी दिल्‍लीला बोलावले होते, असे खुदा बख्‍शने सांगितले.
- दिल्‍लीला राहण्‍याची कोणतीही सोय नव्‍हती. कसेतरी दिवस काढले आणि ऑडीशन देत राहिलो.
- यादरम्‍यान जे मित्र बनले, त्‍यांनी मदत केली. असे करत करत मी थिएटर राऊंडपर्यंत पोहोचलो.
- थिएटर राऊंडमध्‍ये मी 'लाई वी न गई' हे गाणे म्‍हटले. ते लोकांना फार आवडले. त्‍यानंतर मला गोल्‍डन माइक मिळाला.

सर्व काही स्‍वप्‍नवत वाटत आहे
- माझे लहानपणापासून गायक बनण्‍याचे स्‍वप्‍न होते. मात्र कधीही स्‍पर्धेत भाग घेतला नाही. इंडियन ऑयडल हि माझी पहिलीच स्‍पर्धा होती.
- मागील दोन-तीन महिन्‍यांपासून जे काही घडत आहे, त्‍यावर विश्‍वासच बसत नाहीए. मी स्‍वप्‍नांच्‍या जगात वावरत आहे, असे मला वाटू लागले आहे.
- पंजाबमध्‍ये मी ज्‍या भागात राहतो तेथे हिंदी फार कमीजण बोलतात. त्‍यामुळे तेथे हिंदी गाणे शिकणे आणि परफॉर्म करणे फार कठीण गेले.
- शिस्‍त किती महत्‍त्‍वाची असते, हे मला मुंबईला आल्‍यावर कळाले. तेथे मला लोकांनी मला सांगितले की, 'तुझ्यात दम आहे. मात्र तु  घोड्यासारखा फक्‍त धावत आहेस.'    

अशी झाली सुरुवात
- खुदा बख्‍शला पाच मोठ्या बहीणी आहेत. घरात सर्वांनाच गाण्‍याची आवड आहे. त्‍यामुळे खुदा बख्‍शलाही गाण्‍यामध्‍ये रुची निर्माण झाली.
- खुदाची मोठी बहीण अफसाना गाण्‍याची प्रचंड शौकीन आहे. ती अनेकदा बाहेर गाण्‍यांचे कार्यक्रमही करत असते. या कार्यक्रमांमध्‍ये ती अनेकदा खुदाला सोबत घेऊन जाते. यावेळी त्‍यालाही गाण्‍याची संधी मिळायची.
- घरी हे दोघे भाऊ-बहीण रिकामा वेळ असला की गाण्‍याची प्रॅक्‍टीस करायचे. अफसाना 'व्हॉइस ऑफ पंजाब' स्‍पर्धेत टॉप-5 मध्‍ये आली होती.
 
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, फोटोज...
 
 
बातम्या आणखी आहेत...