आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणी केली आत्महत्या, तर कुणाचा झाला अपघात, कमी वयातच झाला या 9 TV Celebs चा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः एकता कपूरच्या 'परिचय नई जिंदगी' (2011-13) या मालिकेत झळकलेली कृतिका चौधरी हिचा 12 जून रोजी मृत्यू झाला. 24 वर्षीय कृतिका चौधरीचा मृतदेह सोमवारी मुंबईच्या अंधेरीमधील चार बंग्लो परिसरातील भैरवनाथ SRA बिल्डींगमध्ये आढळला होता. त्यावेळी पोलिसांनी शंका व्यक्त केली होती की, तिचा मृत्यू अंदाजे चार दिवसांपूर्वी झालेला असू शकतो. समोर येत असलेल्या माहितीनुसार ती घरात एकटी राहायची. सोमवारी सायंकाळी अचानक फ्लॅटमधून दुर्गंध येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली होती.
 
कृतिकाने आत्महत्या केली की तिची हत्या करण्यात आली, याचा तपास पोलिस करत आहेत. वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी कृतिका हे जग सोडून निघून गेली. कृतिकाच नव्हे तर टीव्ही इंडस्ट्रीतील आणखी काही असे सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी कमी वयातच जगाला अलविदा केले. यापैकी काहींचा अपघाती मृत्यू झाला, तर कुणी आत्महत्या केली. काही सेलिब्रिटी असेही आहेत, ज्यांची आजारपणामुळे प्राणज्योत मालवली.  

या पॅकेजमधून जाणून घेऊयात, अशाच 9 टीव्ही सेलिब्रिटींविषयी..

1. प्रदीप कुमार
साऊथ इंडियन टीव्ही अॅक्टर प्रदीप कुमार यांचा 3 मे 2017 रोजी मृत्यू झाला. 29 वर्षीय प्रदीपने हैदराबाद येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.  आत्‍महत्‍येवळी त्‍यांची पत्‍नी घरात नव्‍हती. सहा महिन्‍यांपूर्वीच प्रदीप यांचा विवाह झाला होता. प्रदीपच्‍या मृत्‍यूनंतर पोलिसांनी त्‍यांच्‍या घराची संपूर्ण तपासणी केली. मात्र त्‍यांना कोणतीही सुसाइड नोट मिळाली नाही. प्रदीपच्‍या आत्‍महत्‍येमागील कारण अद्याप कळू शकले नाही. मात्र आर्थिक तंगीमूळे त्‍यांनी आत्‍महत्‍या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. प्रदीप 'सप्तः मातृका', 'सुमंगली' आणि पावनी 'अग्निपुउलू' या तेलगू टीव्‍ही सिरियल्‍ससाठी ओळखले जातात.
 
2. रुबीना शेरगिल
'मिस्टर कौशिक की पांच बहुएं' (2011) या मालिकेत सिमरनची भूमिकेत झळकलेली अभिनेत्री रुबीना शेरगिल हिचे वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी निधन झाले.   रुबीना अनेक दिवस कोमात होती. मालिकेच्या सेटवर तिला अस्थमाचा अटॅक आला होता. त्यानंतर तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हॉस्पिटलमध्ये अनेक दिवस कोमात राहिल्यानंतर 12 जानेवारी 2012 रोजी तिची प्राणज्योत मालवली होती.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, अशाच आणखी 7 सेलिब्रिटींविषयी...  
बातम्या आणखी आहेत...