('झलक दिखला जा-7'मध्ये एका परफॉर्मन्सदरम्यान कृतिका कामरा)
मुंबई - 'झलक दिखला जा-7' या डान्स रिअॅलिटी शोमधून कृतिका कामरा एलिमिनेट झाली आहे. कृतिकाने मोठ्या आशेने शोमध्ये एन्ट्री घेतली खरी, मात्र आपल्या नृत्याने ती प्रेक्षकांना इम्प्रेस करु शकली नाही. शोच्या पहिल्या एपिसोडपासून कृतिका आणि तिचा कोरिओग्राफर सावियो बार्नेस यांच्या सादरीकरणाला परीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र एक उत्कृष्ट डान्सर म्हणून ती स्वतःला सिद्ध करण्यात अपयशी ठरली. कृतिकापूर्वी गेल्या आठवड्यात पूरब कोहली या शोमधून एलिमिनेट झाला होता.
कोण आहे कृतिका कामरा...
कृतिका एक टीव्ही अभिनेत्री आहे. बालाजी टेलिफिल्म्सच्या 'कितनी मोहब्बते है' (2009 मध्ये पहिले पर्व आणि 2010-2011 मध्ये दूसरे पर्व) आणि डायरेक्टर्स कट प्रॉडक्शनच्या 'कुछ तो लोग कहेंगे' (2011-2013) या मालिकेत मुख्य भूमिकेत कृतिका झळकली आहे. 25 फेब्रुवारी 1988 रोजी मुंबईत जन्मलेली कृतिका 2007पासून अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. 2007 मध्ये तिने सब टीव्ही वाहिनीवरील 'जर्सी नं. 10' या शोमधून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. अभिनेत्रीसोबतच कृतिका मॉडेल म्हणूनही ओळखली जाते.
या मालिकांमध्ये झळकली आहे कृतिका...
'जर्सी नं.10' (2007), 'यहां के हम सिकंदर' (2008), 'कितनी मोहब्बत है' (2009 मध्ये पहिले पर्व आणि 2010-2011 मध्ये दूसरे पर्व), 'प्यार का बंधन' (2009-2010), 'कुछ तो लोग कहेंगे' (2011-2013), 'V द सीरियल' (2012), 'एमटीवी वेब्ड' (2014) आणि 'एक थी नायिका' (2013)
रिअॅलिटी शोमध्ये केले काम...
'जरा नच के दिखा' (2010) आणि 'झलक दिखला जा' (2014)
पुढील स्लाईड्समध्ये पाहा कृतिका कामराची 15 निवडक छायाचित्रे. ही सर्व छायाचित्रे इंटरनेटवरील विविध स्त्रोतांमधून साभार घेण्यात आली आहे.