मुंबई: विनोदवीर आणि टीव्ही अभिनेता कृष्णा अभिषेक लवकरच 'फुलटू-जुगाडू' या आगामी सिनेमात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. सिनेमाच्या ऑन-लोकेशन शूटदरम्यान कृष्णा आणि त्याची को-स्टाक निहारिका रायजादाने मीडियासोबत बातचीत केली. यावेळी कृष्णा कॉम्पिटीटर
कपिल शर्माच्या नवीन शोमुळे थोडा अस्वस्थ झाल्याचा दिसला.
कपिल शर्माच्या नवीन शोविषयी कृष्णाने सांगितले, 'मी खूप आनंदी आहे, कपिल त्याचा नवीन शो घेऊन येतोय. पुढील आठवड्यात शो लाँच होणार आहे. हा शो पाहण्यासाठीमी उत्साही आहे. मात्र, त्यालाही टेन्शन येईल, कारण 'कॉमेडी नाइट्स लाइव्ह'लासुध्दा चांगले रेटींग आहे आणि आम्हालाही टेन्शन आहे, कारण माहित नाही नवीन शोमध्ये तो काय घेऊन येणार आहे.'
चॅनलसोबत वाद झाल्यानंतर 2016च्या सुरुवातीला कपिल शर्माने 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' शो सोडला होता. त्यानंतर याचे नाव बदलून कृष्णा अभिषेकला त्याचा होस्ट केले. अर्थातच दोघांमध्ये तुलना होणार आहे. याला कृष्णा हेल्दी कॉम्पिटीशनच्या रुपात घेतोय. कपिल 'द कपिल शर्मा शो'सह 23 एप्रिलला कमबॅक करतोय.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, नवीन शोमध्ये कृष्णाला केले इन्वाइट...