आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'कुमकुम भाग्य\'च्या अॅक्ट्रेसने बॉयफ्रेंडसोबत केले लग्न, 4 वर्षांपासून करत होती डेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडून सुप्रिया शुक्ला, शिखा सिंह (मध्ये), करण शाह (मागे) आणि मृणाल ठाकुर (उजवीकडे) - Divya Marathi
डावीकडून सुप्रिया शुक्ला, शिखा सिंह (मध्ये), करण शाह (मागे) आणि मृणाल ठाकुर (उजवीकडे)
मुंबई: छोट्या पडद्यावरील 'कुमकुम भाग्य' या लोकप्रिय मालिकेत आलियाचे पात्र साकारणारी शिखा सिंह लग्नगाठीत अडकली आहे. शिखाने 1 मे रोजी चार वर्षे जून्या बॉयफ्रेंड करण शाहसोबत लग्नगाठ बांधली आहे. करण पायलट आहे. शिखा आणि करणचे लग्न गुजराती पध्दतीने झाले. तिने ब्राइडल लूकमधील एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला. त्यात ती कुंदनच्या ज्वेलरीमध्ये दिसत आहे. शिखासोबत तिची मैत्रीण को-स्टार मृणाल ठाकुरनेसुद्धा सोशल मीडियावर शिखाच्या लग्नाचा एक फोटो शेअर केला आहे.
अनेक प्रसिध्द शोमध्ये केले काम...
'लेफ्ट राइट लेफ्ट' टीव्ही शोमधून करिअरला सुरुवात करणा-या शिखाने 'मेरी डोली तेरे अंगना', 'न आना इस देश लाडो', 'फुलवा', 'ससुराल सिमर का' आणि 'महाभारत'सारख्या शोमध्ये काम केले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शिखा आणि तिच्या पतीचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...