आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुखचे डॉक्टर करणार कुशालवर शस्त्रक्रिया

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'खतरों के खिलाडी-5' सिनेमादरम्यान कुशाल टंडनच्या खांद्याला झालेली जखम अधिक वाढण्याअगोदर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कुशालच्या खांद्यावरची शस्त्रक्रिया शाहरुखच्या खांद्यावरती शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर करणार आहेत.
याबाबत कुशालने सांगितले की, 'मी माझ्या खांद्याच्या लॅब्रम टिश्यूला अगोदरच इजा पोहोचवली आहे. मात्र, फीजियोथेरपीच्या मदतीने मी खतरों के खिलाडी चित्रपटातील अँक्शन दृश्ये करत होतो. बूट कॅम्प अँक्शनदृश्ये जे कमांडोच्या कवायतीप्रमाणे होते ते करताना खांद्याला गंभीर जखम झाली.' रोहित शेट्टीने कुशालला शाहरुखचे डॉक्टर संजय देसाई यांना भेटण्याचा सल्ला दिला होता.