आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • \'Kya Jazbaati Sawaal Poocha Hai,’ Says Salman When Asked About Aishwarya

\'Bigg Boss\'च्या लाँचिंगवेळी ऐश्वर्याविषयी विचारला प्रश्न, वाचा काय म्हणाला सलमान?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(\'बिग बॉस\'च्या लाँचवेळी सलमान खान)
 
मुंबई - सोमवारी (28 सप्टेंबर) सलमान खानने \'बिग बॉस डबल ट्रबल\' या रिअॅलिटी टीव्ही शोचे लाँचिंग केले. यावेळी सलमान मस्तीच्या मूडमध्ये दिसला. त्याने \'हीरो\' सिनेमाच्या \'मै हू हीरो तेरा\' गाण्यावर ग्रँड एंट्री केली. सहाव्या वेळी शो होस्ट करत असलेल्या सलमानने मीडियासोबत खास बातचीत केली. 
 
ऐश्वर्याच्या प्रश्नावर झाला भावूक- 
मीडियासोबत बातचीत करताना सलमानला एक्स-गर्लफ्रेंड ऐश्वर्या राय बच्चनला सिनेमाच्या प्रमोशनसाठी शोमध्ये आमंत्रित करशील का? असे विचारण्यात आले. यावर सलमान म्हणाला, \'पीआरवाल्यांकडून माईक ओढून घेण्यापूर्वी हा शेवटचा प्रश्न असायला हवा होता. या प्रश्नासाठी टाळ्या. खूपच भावूक प्रश्न विचारला.\'
 
\'बिग बॉस\'मध्ये शाहरुखचे स्वागत आहे-   
एका रिपोर्टरने शाहरुख खानला \'बिग बॉस\'मध्ये बोलवण्याविषयी विचारले. सलमानला विचारले, की \'दिलवाले\' प्रमोट करण्यासाठी एसआरकेला शोमध्ये आमंत्रित केले जाईल. यावर सलमान म्हणाला, \'जर शाहरुखकडे वेळ आणि तारखा असतील आणि त्याला येण्याची इच्छा असेल तर त्याचे बिग बॉसच्या घरात स्वागत आहे. जर त्याला स्पर्धकांसोबत वेळ घालवायचा असेल तर त्याचे मोठे स्वागत आहे.\'
 
\'बिग बॉस सीजन 9\'च्या लाँचिंगवेळी सलमानने खूप डान्स केला. त्याने शोचा एक्स-स्पर्धक राजीव पॉल, सिध्दार्थ भारव्दाज, उर्वशी ढोलकिया, अली कुली मिर्झा, पुनीत इस्सर, करिश्मा कोटक, आर जे प्रीतम यांना प्रश्न-उत्तरे करण्यात आली. \'बिग बॉस 9\' 11 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या लाँचिंग इव्हेंटचे PHOTOS...