आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'क्योंकि सास भी कभी बहू थी\'च्या अॅक्टरने केले लग्न, 8 वर्षांपासून करत होता डेटिंग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीव्ही अभिनेता नमन शॉ गर्लफ्रेंड नेहा मिश्रासोबत विवाहबद्ध झाला. - Divya Marathi
टीव्ही अभिनेता नमन शॉ गर्लफ्रेंड नेहा मिश्रासोबत विवाहबद्ध झाला.

मुंबईः टीव्ही अभिनेता नमन शॉ गर्लफ्रेंड नेहा मिश्रासोबत साता जन्माच्या गाठीत अडकला. 24 नोव्हेंबर रोजी कोलकातामध्ये दोघांचे लग्न झाले. लग्नात दोघांचे केवळ फॅमिली मेंबर्स सहभागी झाले होते. अलीकडेच या कपलच्या लग्नाचे फोटोज समोर आले आहेत. लग्नात टीव्ही इंडस्ट्रीतील सेलिब्रिटी सहभागी झाले नव्हेत. पण रिसेप्शनला निवडक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती. लग्नात नमनने सिल्व्हर वर्क असेलली गोल्डन कलरची शेरवानी परिधान केली होती. तर नेहा मरुन अँड पिंक कलरच्या लहेंग्यात अतिशय सुंदर दिसली.


8 वर्षांपासून डेटिंग करत होते नमन-नेहा...
- नमन आणि नेहा दीर्घकाळापासून एकमेकांना ओळखतात. दोघांची भेट एका टीव्ही शोच्या सेटवर झाली होती.
- कालांतराने दोघांमध्ये प्रेम फुलले. हे कपल गेल्या आठ वर्षांपासून डेट करत आहेत.
- याचवर्षी 4 जून रोजी नमन आणि नेहा यांनी साखरपुडा केला होता. 

 

या टीव्ही शोजमध्ये झळकला आहे नमन
- नमनने आपल्या टीव्ही करिअरची सुरुवात 2004 साली 'इंडियाज बेस्ट सिनेस्टार की खोज' या कार्यक्रमातून केली होती. 
- त्यानंतर तो 'कसम से'(2006), 'क्योंकि सास भी कभी बहू थी'(2006), 'कसौटी जिंदगी की'(2007), 'कस्तूरी'(2008), 'कह न सके'(2008), 'जीत जाएंगे हम'(2009), 'त्रित्या'(2010), 'रक्त संबंध'(2010), 'पिया रंगरेज'(2015), 'टशन-ए-इश्क'(2016) या टीव्ही शोजमध्ये झळकला.


पुढील स्लाईड्सवर बघा, नमन आणि नेहा मिश्रा यांचे वेडिंग PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...