'बिग बॉस 7' संपल्यानंतरसुध्दा या शोचे वादविवाद संपले नाहीत. शनिवारी उशीरा शो संपताच बिग बॉसच्या घरात पोलिस दाखल झाले. पोलिसांनी अरमान कोहली आणि सोफिया हयात यांच्यामध्ये झालेल्या वादाविषयी घरातील सर्व सदस्यांची चौकशी केली. गोहर खान 'बिग बॉस 7'ची विजेती झाली. तनिषा मुखर्जी या शोची रनर-अप ठरली. शोमध्ये चार फायनलिस्ट होते- गोहर खान, संग्राम सिंह, एजाज खान आणि तनिषा मुखर्जी. शनिवारी ग्रँड फिनालेमधून सर्वात पहिले संग्रामला बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर एजाजला बाहेर काढल्यानंतर हे निश्चित झालं होतं, की पुन्हा एकदा एका स्त्रीच्या डोक्यावरच 'बिग बॉस 7'चा मुकुट सजणार आहे. शोचा होस्ट सलमान खानने गोहर खानला विजेताची ट्रॉफी दिली. बिग बॉसच्या घरात तनिषा आणि संग्राम 105 दिवस राहिले आणि गोहर 103 दिवस तर एजाज 65 दिवस राहिला.
'बिग बॉस 7'चा फिनाले शनिवारी रात्री सलमान खान आणि एलीच्या डान्ससोबत धमाकेदार रुपात झाला. त्यानंतर अरमान कोहलीने सलमान खानसोबत 'देसी बीट' या गाण्यावर डान्स केला आणि प्रत्यूषा, काम्यानेसुध्दा सलमानसोबत 'फेविकॉल से' गाण्यावर डान्स केला. सलमान खानने त्याची आवडती स्पर्धक एली अवरामसोबत माशाल्लाह माशाल्लाह या गाण्यावर डान्स केला. एलीने सोलो परफॉरमन्ससुध्दा केला. तिने 'ये मेरा दिवानापन', 'धक धक करने लगा' आणि 'हवा हवाई' या गाण्यांवर सादरीकरण केलं. या शोच्या फायनलमधील स्पर्धक एजाज, संग्राम, गोहर आणि तनिषा यांनीसुध्दा फिनालेमध्ये डान्स केला.
गोहर खान : बिग बॉसच्या घरात अभिनेत्री गोहर खान तिच्या दबंग वागणूकीने आणि बिंधास्त अंदाजाने ओळखली जातं होती. गोहरने घरात नेहमीच स्टँड घेतला आणि दुस-यांना चुका सुधारण्यासाठी सांगत राहिली. गोहर खान एकमेव अशी स्पर्धक आहे जिला बिग बॉसच्या घरात प्रेम झालं. गोहरने कधीच तिचं प्रेम लपवलं नाही.
पुढे वाचा संग्राम, एजाज आणि तनिषाविषयी...