आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News Aamir Khan Releases Documentary On Journey Of Lagaan

टि्वटरवर 'चले चलो' टॉप ट्रेंडमध्ये, प्रेक्षक म्हणाले- अनरिलीज सांगून आमिरने केली फसवणूक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली: अभिनेता आमिर खानचा 'लगान' सिनेमा तयार करताना केलेली कहानी 'चले चलो' सोमवारी टि्वटरच्या टॉप ट्रेंडमध्ये होती. आमिर खानने या डॉक्युमेंट्रीला अनरिलीज सांगून त्याचा जोरदार प्रचार केला होता. रविवारी संध्याकाळी 8 वाजता अँड पिक्चर चॅनलवर आमिर जेव्हा पडद्यावर आला तेव्हा त्याने स्वत: स्वीकार केले, की ही फिचर फिल्म नसून एक डॉक्युमेंट्री आहे. आमिरने सांगितले, की 2006मध्ये देशातील दोन शहरांत ही डॉक्युमेंट्री एक आठवडा चालू होती.
आता सोशल मिडियावर त्याचे चाहते आणि लोक 'दिशाभूल करणा-या प्रचारा'ची निंदा करत आहेत तर काही लोक त्याची प्रशंसासुध्दा करत आहेत. आमिर खाननुसार, या डॉक्युमेंट्रीला नॅशनल अवॉर्डसुध्दा मिळालेला आहे.
'चले चलो'ची स्क्रिनिंग यशराज स्टुडिओमध्ये झाली आणि तिथूनच त्याचे टीव्ही प्रीमिअरसुध्दा झाले. करण जोहरने हा कार्यक्रम होस्ट केला.
आमिरच्या मित्राने बनवला 'चले चलो'
2001मध्ये आमिर खान निर्मित 'लगान' सिनेमा रिलीज झाला. आमिरचा बालपणीचा मित्र सत्यजीत भटकल 'लगान'च्या शुटिंगदरम्यान प्रत्येक क्षण आपल्या कॅमे-यात कैद करत होता. त्याचा आधार घेऊनच त्यांनी 'चले चलो'ची कहानी बनवली. सत्यजीत भटकलने 'सत्यमेव जयते'चेसुध्दा दिग्दर्शन केले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि वाचा सोशल साइट्सवर 'चले चलो'बाबत काय-काय प्रश्न उपस्थित झाले...?