आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्हीवर आता दिसू शकतील अ‍ॅडल्ट सिनेमे, सीबीएफसीच्या सदस्यांनी मांडला प्रस्ताव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - आता प्रौढ सिनेमातील दृश्यांना कात्री न लावता सिनेमा जशाचा तसा टीव्हीवर प्रसारित करण्यात यावा, असा प्रस्ताव सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सीबीएफसी)च्या वतीने ठेवण्यात आला आहे. यासाठी रात्री उशीराचा स्लॉट देण्यात यावा असे त्यांच्या प्रस्तावात म्हटले आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनच्या सदस्यांनी सूचना प्रसारण मंत्रालयाचे सचिव बिमल जुल्का यांची भेट घेऊन हा प्रस्ताव त्यांच्याकडे ठेवला.
प्रौढ सिनेमांविषयीची सद्य स्थिती...
प्रौढ सिनेमा टीव्हीवर प्रसारित होण्यापूर्वी त्यातील कंटेंटमध्ये बदल करुन त्याला 'ए' ऐवजी 'यूए' किंवा 'यू' सर्टिफिकेट दिलं जातं. सर्टिफिकेशवेळी याची खात्री केली जाते, की चित्रपटातील उत्तेजक दृश्य वगळण्यात आले असून आता त्याला टीव्हीवर प्रसारित करण्यात कोणतीही अडचण नाही.
प्रौढ सिनेमा उशीरा रात्री टीव्हीवर प्रसारित करण्याच्या बोर्डाच्या प्रस्तावाची अंमलबजावणी होण्याची प्रक्रिया बरीच लांबलचक आहे. यासाठी संबंधित पक्षांसोबत चर्चा करावी लागणार आहे. चर्चेनंतरच पुढील दिशेने पाऊले उचलता येतील.
सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनच्या प्रवक्ता अंजुम राजाबाली यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोर्डाने 1952 च्या प्रसारण अॅक्टमध्येही बदल सुचवले आहेत. सीबीएफसीच्या चेअरपर्सन लीला सॅमसंग यांनी सांगितल्याप्रमाणे, एखाद्या सिनेमाच्या सर्टिफिकेशनच्या प्रक्रियेनुसार सिनेमा बघणा-या सल्लागार समितीमधील दोन तृतीयांश सदस्य सिनेमातील कटेंटविषयी बोर्डचे अधिकारी आणि अध्यक्षांना आपला अहवाल सादर करतात. त्यांच्या अहवालात सिनेमाच्या कटेंटविषयी आक्षेप घेण्यात आला नसेल, तर तो सिनेमा टीव्हीवर प्रसारित केला जाऊ शकतो.