(फाइल फोटो: तस्लीमा नसरीन)
मुंबई- आपल्या लिखाणातून नेहमी खळबळ उडवून देणार्या बांगलादेशच्या लेखिका तस्लीमा नसरीन यांना 'बिग बॉस' या टीव्ही शोची ऑफर मिळाली आहे. तस्लीमा नसरीन यांनी टि्वट करून सांगितले, की 'बिग बॉस'च्या 8व्या पर्वात सहभागी होण्याचा प्रस्ताव आपण स्वत: फेटाळला होता. तस्लीमा सध्या भारतात राहण्यासाठी परवानगी कधी मिळेल याच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांचा व्हिजा 17 ऑगस्ट रोजी संपणार आहे.
तस्लीमा नसरीन म्हणाल्या...मी कठोर शब्दात दिला होता नकार
तस्लीमा नसरीन यांनी रविवारी (3 ऑगस्ट) केलेल्या टि्वट म्हटले आहे की, 'बिग बॉस'मध्ये मला आमंत्रित करण्यात आले होते. 'कलर्स टीव्ही' चॅनलने मला फोन करून सांगितले. परंतु मी विनम्रतापूर्वक हा प्रस्ताव फेटाळून लावला. त्यांनी मला पैशाचे आमिषही दाखवले. शोच्या माध्यमातून स्वत:ला जगात सादर करण्याची संधी मिळेल, असेही सांगितले.मात्र, मी त्यांच्या शब्दात अडकले नाही.' दुसरीकडे, 'कलर्स'ने याप्रकरणी अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.
शोच्या विरोधात तस्लीमा
एका इंग्रजी वर्तमानपत्राला तस्लीमा नसरीन यांनी सांगितले, 'मी हा शो पाहिला आहे. त्यातून मनोरंजन होते, मात्र, माझी त्यात रुची नाहीये. त्यांनी मला शोमध्ये येण्यासाठी विनंती केली, परंतु मी त्यासाठी तयार नाहीये. तसे पाहता मी या शोच्या विरोधात आहे. चॅनलने मला असेही सांगितले, की शोच्या माध्यमातून मी महिलांच्या अधिकारांविषयी माझे विचार मांडू शकेल मात्र मी साफ नकार दिला.'
अॅडल्ट स्टार शांती डायनामाइट होऊ शकते शोचा भाग
'बिग बॉस 8'च्या पाहुण्यांविषयी सध्या जोरात चर्चा चालू आहेत. यात
अक्षय कुमारसारख्या स्टार्सच्या नावाचीही चर्चा रंगल्या आहेत. सलमानने 'बिग बॉस 7'दरम्यान शोला होस्ट करणार नसल्याचे सांगितले होते. मात्र वाहिनीला सलमानची मनधरणी करण्यात यश मिळाले असून तोच या पर्वाचाही होस्ट असणार आहे. आता होस्ट म्हणून सलमानच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे आता उत्सुकता आहे ती शोमध्ये सहभागी होणा-या पाहुण्यांविषयी..
सूत्रांच्या सांगण्याप्रमाणे, शोमध्ये पाहूणे म्हणून सलमानची खास मैत्रीण लुलिया वेंचर, अॅडल्ट स्टार शांती डायनामाइट, जॅकी श्रॉफ, अलोकनाथ, हनी सिंग, विनोदवीर सुनील ग्रोवर हेसुध्दा सामील होऊ शकतात. सांगितले जाते, की 'आप' नेते आणि कवी कुमार विश्वास यांच्याशीसुध्दा संपर्क साधण्यात आला आहे. मात्र त्यांनी शोमध्ये सामील होण्यासाठी एक अट ठेवली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या कोण-कोण होणार 'बिग बॉस 8'चे पाहूणे...