कपिल शर्मा
मुंबई: यशराज फिल्म्सने कपिल शर्माला मोठा धक्का दिला आहे. त्यांच्या आगामी 'बँक चोर' सिनेमामधून कपिलची हकालपट्टी करण्यात आली आहे. कपिल या सिनेमामधून बलिवूडमध्ये एंट्री करणार होता. मात्र आता होणार नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
ताजी बातमी आहे, की YRF फिल्म्सचा 'बँक चोर' आता कपिल शर्माशिवाय तयार होणार आहे. यशराज फिल्म्समध्ये यूथ फिल्म्स, टॅलेन्टेड मॅनेजमेंट ब्रँड पार्टनरशिपचे बिझनेस अँड क्रिएटीव्ह प्रमुख आशिष पाटिल यांनी याची पुष्टी दिली आहे. त्यांनी सांगितले, 'भविष्यात चांगली वेळ आल्यास आम्ही सोबत काम करू. याविषयी कपिलकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाहीये.'
काय आहे सिनेमाची कहानी
'बँक चोर' एक कॉमेडी सिनेमा आहे. सिनेमाची कहानी तीन मुर्ख व्यक्तीभोवती गुंफण्यात आली आहे. ते एक बँक लुटण्यासाठी योजना तयार करतात. मात्र बँक लुटण्यासाठी वाईट दिवसाची निवड करतात. अचानक ते पोलिस, भ्रष्ट नेते आणि उद्योगपती यांच्या हातात लागतात.
'बँक चोर' बंपीने दिग्दर्शित करणार असून आशिष पाटिल निर्मित करणार आहे. आता या सिनेमाची औपचारिकरित्या घोषणा कधी होणार हे बघणे रंजक ठरणार आहे.