आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बिग बॉस'ने जगासमोर उघड होऊ दिले नाही राजेश खन्ना यांचे रहस्य, अनिताने लावला आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'बिग बॉस'च्या सातव्या पर्वातील स्पर्धक अनिता अडवाणी गेल्या आठवड्यात घराबाहेर पडली. कमी वोट्स मिळाल्याने अनिताला शोबाहेर पडावे लागले. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अनिताने काही आरोप लावले आहेत.
अनिताने म्हटले, की शोदरम्यान इतर स्पर्धकांबरोबर चर्चा करताना तिने दिवंगत सुपरस्टार राजेश खन्ना यांच्याविषयीची अनेक रहस्य उघड केले होते. मात्र ते शोमधून एडिट करण्यात आले.
याशिवाय अनिताने खुलासा केला, की या शोमध्ये ती पैशांसाठी सहभागी झाली होती. कारण राजेश खन्ना यांच्या कुटुंबीयांच्या विरोधात कोर्टात खटला सुरु आहे, त्यासाठी तिला पैशांची गरज आहे.
अनिताने म्हटले, की राजेश खन्ना यांच्याबरोबर असलेल्या नात्यावर मला गर्व आहे आणि आता मी स्वतंत्र राहू इच्छिते. संपत्तीवरुन डिंपल कपाडियाबरोबर जो खटला सुरु आहे, तो मी एका फायटरप्रमाणे लढणार आहे.
अनिताने म्हटले, की मी घरातील इतर स्पर्धकांप्रमाणे राजकारण किंवा षडयंत्र रचू शकत नाही. त्यामुळे मी बाहेर पडले. शोमध्ये अनेक स्पर्धक उद्धट होते. मात्र त्यांनी केवळ माझी सॉफ्ट बाजू बघितली. मी सांगू इच्छिते, की जर कुणी माझ्यासोबत चुकीचे वागले तर त्याला मी नक्कीच अद्दल घडवते.
पुढे वाचा, तनिषा आणि शिल्पाबरोबर झाली होती मैत्री...