आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Laut Aao Trisha Actress Nalini Negi Likely To Be Arrested For Thieving

TV अॅक्ट्रेसच्या विरोधात चोरी केल्याची तक्रार दाखल, CCTV फुटेजमध्ये झाली कैद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलीकडेच टीव्ही अभिनेत्री नलिनी नेगी आणि तिची मैत्रीण नेहा नांगियाच्या विरोधात मुंबईच्या बांगुर पोलिस ठाण्यात चोरी केलीची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
काही दिवसांपूर्वी मुंबईच्या श्रीनिती हाइट्स इमारतीत राहणा-या रेणू शिरोनी आणि तन्वी गुप्ताने नलिनीची मैत्रीण आणि मॉडेल नेहा नांगिया आपली रुममेट केले.
3 ऑक्टोबरला रेणू आणि तन्वी शहराबाहेर गेल्या होत्या, तेव्हा नेहाने संधी पाहून नलिनीला घरी बोलावले आणि बनावट चावीच्या मदतीने रेणू आणि तन्वीचे लॉकर उघडले. दोघींनी लॉकरमध्ये ठेवलेले सोने आणि पैसे काढले.
घरी परतल्यानंतर रेणू आणि तन्वीने लॉकर उघडले तर त्यात तिला सोने आणि पैसे दिसले नाही. तिने इमारतीच्या चौकीदाराकडे चौकशी केली. चौकीदाराने सांगितले, की नलिनी आणि तिच्या एका मैत्रिणीला एका बॅगसह रात्री 10 वाजता बाहेर जाताना पाहिले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाली आहे. हे सीसीटीव्ही फुटेज बांगुर पोलिस ठाण्यात आहेत. या फुटेजच्या साहाय्याने नलिनीची ओळख पटली आहे. तिच्या विरोधात चोरी केल्याची तक्रारसुध्दा दाखल झाली आहे.
कोण आहे नलिनी नेगी-
नलिनीने करिअरची सुरुवात MTVवर प्रसारित होणा-या 'स्पल्ट्सव्हिला' या रिअॅलिटी शोमधून केली. त्यानंतर ती 'इमोशनल अत्याचार', 'लौट आओ तृषा'सारख्या मालिकांतसुध्दा दिसली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा नलिनीचे सीसीटीव्हीमध्ये कैद झालेले फोटो आणि इतर ग्लॅमरस फोटो...