मुंबईः छोट्या पडद्यावरील वादग्रस्त शो म्हणून ओळखल्या जाणा-या '
बिग बॉस'च्या नवव्या पर्वाची थीम लीक झाली आहे. बातम्यांनुसार, शोची यावेळची थीम ही 'नवरंग'वर बेल्ड असणारेय. इतकेच नाही तर 'बिग बॉस'च्या नव्या घराची काही छायाचित्रेसुद्धा मीडियात आली आहेत. ती तुम्ही पुढील स्लाईड्समध्ये बघू शकता.
सलमान खान होस्ट करणार शो
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान नेहमीप्रमाणे यंदाचेही 'बिग बॉस'चे पर्व होस्ट करणार आहे. याची माहिती स्वतः सलमानने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. त्याने ट्विट केले, ''बिग बॉसचे सीझन 9 माझे आहे.'' सूत्रांच्या माहितीनुसार, सलमानने यंदाच्या पर्वासाठी आपल्या मानधनात वाढ करुन घेतली आहे. प्रत्येक एपिसोडसाठी सलमान 10 कोटींचे मानधन घेणार असल्याची चर्चा आहे.
स्पर्धकांची नावे झाली लीक
'बिग बॉस'च्या नवव्या पर्वात कोणते सेलिब्रिटी सहभागी होणार याचीही माहिती उघड झाली आहे. वादग्रस्त आध्यात्मिक गुरु राधे माँसोबत श्वेता बसू, पूनम पांडे, यो यो हनी सिंग, मल्लिका शेरावत, रघु राम या स्टार्सची नावे समोर आली आहे. अद्याप अधिकृतरित्या स्पर्धकांची नावे घोषित करण्यात आलेली नाहीत.
11 ऑक्टोबरपासून सुरु होणार बिग बॉस
'बिग बॉस'चे नववे पर्व 'झलक दिखला जा रिलोडेड'नंतर सुरु होणार आहे. रिपोर्ट्सनुसार, येत्या 11 ऑक्टोबरपासून रात्री 10.30 च्या सुमारास हा शो छोट्या पडद्यावर प्रसारित केला जाणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'बिग बॉस'च्या नवीन घराची लीक झालेली छायाचित्रे...