आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Learn About Priya Malik The New Wild Card Contestant Of Bigg Biss 9

BB9 : डेहरादूनमध्ये जन्म, ऑस्ट्रेलियात बनली टीजर, जाणून घ्या प्रिया मलिकविषयी A to Z

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 'बिग बॉस'च्या नवव्या पर्वात गेल्या आठवड्यात ऑस्ट्रेलियाच्या भारतीय वंशाच्या प्रिया मलिकची एन्ट्री झाली. तिच्या येण्याने घरातील वातावरण बदलले आहे. प्रिया 2014 मध्ये प्रसारित झालेल्या 'बिग ब्रदर' या ऑस्ट्रेलियन रिअॅलिटी शोची फायनलिस्ट ठरली होती. या शोमध्ये ती आपल्या वागण्यामुळे प्रसिद्ध झाली होती. आता बिग बॉसमध्ये तिचा प्रवास कसा होतो, हे बघणे रंजक ठरणार आहे. एक नजर टाकुया प्रिया मलिकशी निगडीत खास गोष्टींवर...
डेहरादूनमध्ये जन्म, व्यवसायाने शिक्षिका
28 वर्षीय प्रिया मलिकचा जन्म उत्तराखंडच्या डेहरादूनमध्ये झाला. तिने दिल्ली युनिव्हर्सिटीतून इंग्लिश ऑनर्समध्ये डिग्री प्राप्त केली. त्यानंतर ती उच्चशिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाच्या यूनिव्हर्सिटी साउथला गेली. 'बिग ब्रदर'मध्ये सहभागी होण्यापूर्वी ती ऑस्ट्रेलियाच्या एका कॉलेजमध्ये शिक्षिका होती. प्रियाला कविता करणे पसंत आहे. सप्टेंबर 2013 मध्ये ऑस्ट्रेलियन 'पोएट्री स्लॅम'ची फायनलिस्ट ठरली होती.
कॉमेडिअनच्या रुपात प्रसिद्ध
प्रियाला कॉमेडिअन म्हणूनही ओळखले जाते. एडिलेड कॉमेडी फेस्टिव्हलमध्ये तिने परफॉर्म केले आहे. या शोमध्ये जगातील सर्वात फनी स्टँडअप कॉमेडिअन सहभागी होत असतात.
'बिग ब्रदर'मध्ये गेली होती वर्णभेदाला सामोर
2007 मध्ये 'बिग ब्रदर' या ब्रिटिश रिअॅलिटीच्या शोच्या पाचव्या पर्वात अभिनेत्री शिल्पा शेट्टीला वर्णभेदाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर 2014 साली प्रिया मलिकलासुद्धा अशाच घटनेला सामोरे जावे लागले होते. प्रिया या शोच्या टॉप 5 अंतिम स्पर्धकांमध्ये सामील झाली होती.
विवाहित आहे प्रिया मलिक
13 एप्रिल 2008 रोजी प्रिया तिचा बॉयफ्रेंड भूषण मलिकसोबत विवाहबद्ध झाली होती.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला प्रिया मलिकचा ग्लॅमरस अंदाज छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत.