(फाइल फोटो : खुशबू रावल सलमान खानसोबत)
मुंबई- '
बिग बॉस'च्या मागील पर्वातत दिसलेली 'खुबसुरत परी' अर्थातच खुशबू रावल 'बिग बॉस डबल ट्रबल'मध्ये गायब आहे. सीझन 8मध्ये तिला एअरपोर्टी जल्लाद (चिंतन गंगर)सोबत पाहिल्या गेले होते. खुशबू यावेळी या शोमध्ये का दिसली नाही? हा प्रश्न सर्वांनाच पडला असावा. divyamarathi.comने याची माहिती घेण्यासाठी तिच्याशी खास बातचीत केली आहे. यावेळी खुशबूने सांगितले, की यावेळी तिला शोसाठी अॅप्रोच करण्यात आले नाही. ती म्हणते, 'मला वाईट वाटतेय, की 'बिग बॉस' टीमने मला संपर्क केला नाही. असे वाटते, की त्यांना एखादी परदेशी तरुणी हवी होती. त्यामुळे त्यांनी मला अॅप्रोच केले नाही. मी पुन्हा 'बिग बॉस'मध्ये काम करण्यासाठी उत्सूक आहे. कारण यामागील माझा अनुभव अविस्मरणीय होता.'
कसा मिळाला होता 'बिग बॉस'?
खुशबू रावलने जूने अनुभव शेअर करताना सांगितले, की तिला 'बिग बॉस'मध्ये कशी एंट्री मिळाली. खुशबू सांगते, 'मला 'बिग बॉस'चा ऑफर मिळाला, तो दिवस कधीच विसरू शकत नाही. मी एका खासगी पार्टीते गेले होते. तेव्हा एका को-ऑर्डिनेटरची नजर माझ्यावर पडली. जेव्हा त्याने मला शो ऑफर केला तेव्हा वाटते, की एखाद्या सहायक अभिनेत्रीसारखी एखादी भूमिका असेल. मला या शोविषयी काहीच माहित नव्हते. सलमान खान हा शो होस्ट करतोय हेदेखील मला माहित नव्हते. नंतर माझ्या एका मैत्रीणीने मला समजावले आणि मी हा शो साइन केला. शोदरम्यानचे अनुभव चांगले होते. सलमान खूप चांगला व्यक्ती आहे. शिवाय चिंतनसोबतची माझी केमिस्ट्रीसुध्दा लोकांना आवडली. चिंतनने शोदरम्यान माझी खूप मदत केली.'
मुंबईमध्ये राहते खुशबू-
20 वर्षीय खुशबू रावलचा जन्म मुंबईमध्ये झाला. ती आपल्या आई-वडील, भाऊ-बहीण यांच्यासोबत राहते. तिला डान्स करायला, गाणे गायला आणि अभिनय करायला आवडते. तिला अभिनयातच करिअर करायचे आहे. सध्या ती मुंबई यूनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा खुशबू रावलचे ग्लॅमरस फोटो...