बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप या आठवड्यात करण जोहरच्या 'कॉफी विथ करण 4' या चॅट शोमध्ये आले होते. अनुष्का अनुरागच्या 'बॉम्बे वेलवेट' या सिनेमात काम करत आहे. त्यामुळे ते दोघे करणच्या या चॅट शोमध्ये दिसले होते. अनुष्का दुस-यांदा करणच्या चॅट शोमध्ये आली होती. यापूर्वी ती शोच्या तिस-या पर्वात रणवीर सिंहसोबत आली होती. परंतु यावेळी करणच्या प्रश्नांचे उत्तर अनुष्का सावधगिरीने देणार असल्याचे तिच्याकडे बघून जाणवत होते.
शोमध्ये करणने तिला विराट आणि तिच्या नात्याविषयी काही प्रश्न केले. करणच्या काही आक्रमक प्रश्नांवर अनुष्का थोडी गोंधळात पडली आणि तिने मौन बाळगणे पसंत केले. जेव्हा अनुष्काला सर्व प्रश्न जड वाटायला लागले तेव्हा ती करणला म्हणली, 'करण, प्लीझ शट अप. आय अॅम फिलींग नेकेड.'
परंतु तो तिचे ऐकण्याच्या तयारित नव्हता त्याने त्याच्या प्रश्नांचा भडीमार तसाच चालू ठेवला आणि म्हणाला, 'भारताचे यश तुझ्या हातात आहे अनुष्का.' करणच्या या प्रश्नाने अनुष्का लाजली आणि तिने स्मित हस्य केले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या करणच्या कोणत्या प्रश्नावर अनुष्काने काय उत्तर दिले?