आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे श्वेता तिवारीची 15 वर्षीय मुलगी, आईला दुस-या लग्नासाठी केले होते तयार!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: अभिनेत्री श्वेता तिवारी दुस-यांदा आई होणार आहे. रिपोर्ट्सनुसार, तिची डिलिव्हरी नोव्हेंबरमध्ये होणार आहे. श्वेता सध्या प्रेग्नेंसीचा काळ एन्जॉय करत आहे. अलीकडेच श्वेताची काही छायाचित्रे समोर आली, यामध्ये ती फ्रेंड्स आणि तिची मुलगी पलकसोबत एन्जॉय करताना दिसली.

15 वर्षांच्या मुलीची आई आहे श्वेता..
श्वेताला पहिल्या लग्नापासून एक मुलगी असून आता ती 15 वर्षांची आहे. पलक हे तिचे नाव आहे. जेव्हा श्वेता दुस-यांदा आई होणार अशी बातमी आली तेव्हापासून पलकसुध्दा चर्चेत आली. तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पलक नेहमी इंस्टाग्रामवर स्वत:चे फोटो शेअर करत असते.
मुलीनेच आईला दुस-या लग्नासाठी केले तयार...
पलक श्वेता आणि तिचा पहिला पती राजा चौधरीची मुलगी आहे. 2007मध्ये श्वेताने राजासोबतचे 9 वर्षे जूने नाते संपुष्टात आणले होते. घटस्फोट झाल्यानंतर तब्बल 6 वर्षांनी 2013मध्ये श्वेताने अभिनेता अभिनव कोहलीसोबत दुसरे लग्न केले. त्यापूर्वी त्यांनी तीन वर्षे एकमेकांना डेट केले होते. असे म्हटले जाते, की पलकने आपली आई श्वेताला लग्नासाठी तयार केले होते. श्वेता आणि अभिनवचे लग्न झाले, तेव्हा पलकचा आनंद स्पष्ट दिसून येत होता.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा श्वेता तिवारीच्या मुलीचे PHOTOS...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...