आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता अशी दिसते 'तारक मेहता...' तील छोटी सोनू, जाणून घ्या काय करतेय सध्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झील मेहता. - Divya Marathi
झील मेहता.
मुंबई - 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मधील छोटी सोनू तुम्हाला आठवतेय का.. ही सोनू म्हणजेच झील मेहता. तिने अभ्यासावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी शो सोडला होता. वयाच्या 9 व्या वर्षी शोमध्ये आलेल्या झीलने 14 व्या वर्षापर्यंत शो केला. आता झील 18 वर्षांची झाली आहे. ती सध्या काय करत आहे हे जाणून घेण्यासाठी आमच्या प्रतिनिधीने तिच्याशी खास बातचित केली.
अॅक्टींगशिवाय वेगळे काहीतरी करायचे होते..
झील सांगते शोतील प्रत्येक आठवण माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. 'तारक मेहता...' ने ने मला प्रसिद्धी आणि पैसा दोन्हीही दिले. पण मला अॅक्टींगव्यतिरिक्त वेगळे काहीतरी करायचे होते. मी अभ्यासासाठी शो सोडला होता. बोर्डाच्या परीक्षेत (ICSE) मला 93.3% मार्क मिळाले. त्यामुळे मी निर्णयाने आनंदी होते.

सध्या BBA करतेय..
झीलने सांगितले की, तिला 93.3% मार्क्स मिळाले तेव्हा लोकांना मी मेडिकल लाइनमध्ये जाईल असे वाटले होते. माझीही तशी इच्चा होती. पण मी कॉमर्स घेतले. सध्या मी NMMIS (Narsee Monjee Institute of Management Studies), मुंबईमधून BBA करतेय आणि मला परदेशात जाऊन MBA करण्याची इच्छा आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, झीलचे बालपणीपासूनचे आतापर्यंतचे काही PHOTOS
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...